BAMU News सकाळ
छत्रपती संभाजीनगर

पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेशही ऑनलाईन, ३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी

संदीप लांडगे

औरंगाबाद : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Babasaheb Ambedkar Marathwada University) विविध विभागांत राबविण्यात येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान नोंदणी करण्यात (Online Admission) येणार आहे. या संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची बैठक घेऊन (Aurangabad) आढावा घेण्यात आला. त्यानूसार २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. बारावीचे निकाल (Bamu) नुकतेच जाहीर झाले असून विद्यापीठात सुरु असलेल्या ९ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये बी.व्होक ऑटोमोबाईल, इंडस्ट्रीयल अ‍ॅटोमेशन (पदवी), अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ग्राफीक्स आटर्स अ‍ॅडव्हान्स (डिप्लोमा), सर्टिफिकेट ऑफ प्रोफिसियन्सी इन चायनीज, जर्मन फ्रेंच (डिप्लोमा), अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा ऑफ प्रोफिसियन्सी इन चायनीज, जर्मन, फ्रेंच (अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा), बी.ए.जनसंवाद व वृत्तपत्रविद्या (पदवी), बॅचलर ऑफ परफॉमिंग आर्टस् बी.पी.ए, (पदवी), बी.एफ.ए ब्रीज कोर्स (पदवी एक वर्ष), सर्टिफिकेट इन मोडी स्क्रिप्ट (पदविका) या विषयांचा समावेश आहे.

प्रवेशासाठी ‘सीईटी‘ असणार नाही तर गुणवत्तेच्या आधारावर ४ ते १४ सप्टेंबर दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊन लगेच तासिकांना सुरुवात होईल, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णु क-हाळे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT