प्रलंबित फाइल्सचा निपटारा करा; ई-ऑफिसवर भर द्या
-----
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे विभागप्रमुखांना निर्देश
---
हिंगोली, ता. १९ : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, तसेच ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सोमवारी (ता. १९) दिले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा व प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासकीय कामे विहित मुदतीत पूर्ण करणे, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे व प्रशासकीय प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळणे आवश्यक असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. कागदविरहित आणि गतिमान कारभारासाठी ई-ऑफिस प्रणाली प्रभावीपणे राबविण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. ई-फाइल्स क्रिएशन आणि ई-फाइल्स रिसीट क्रिएशन या प्रक्रियांचा आढावा घेऊन फाइल्सचा निपटारा जलदगतीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच आपले सरकार पोर्टलवरील अर्ज व तक्रारी, लोकायुक्त प्रकरणे, प्रलंबित चौकशी, पीजी पोर्टल आणि न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करून कामकाजात सुधारणा करावी, असे निर्देशही देण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, विजय बोराटे, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, शिक्षणाधिकारी मंजुश्री कलेवाड, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे आदी उपस्थित होते.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.