छत्रपती संभाजीनगर

तुम्ही पोलिस आहात का? म्हणत पोलिसाची धरली गचांडी

CD
तुम्ही पोलिस आहात का? विचारत धरली गचांडी! --- छत्रपती संभाजीनगर : भररस्त्यात दुचाकी आडवी लावत ट्रॅव्हल्सचालकाशी वाद घालणाऱ्यास पोलिस समजावण्यासाठी गेले असता त्यांनीच ‘तुम्ही पोलिस आहात की नाही, मला दाखवा, असे म्हणत अक्षरशः पोलिसाची गचांडी धरली. हा प्रकार १८ ऑक्टोबरच्या रात्री सव्वाबाराच्या सुमारास केंब्रिज चौकात घडला. या तरुणांना कायदेशीर नोटीस बजावून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आनंद अशोक घोरपडे (वय २८, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे अंमलदार समाधान उबाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री पोलिस उपनिरीक्षक आर.एस. बिघोत, अंमलदार समाधान उबाळे आणि चालक ऋषीकेश सांगळे हे शासकीय वाहनातून रात्रगस्त घालत होते. मध्यरात्री पथक केंब्रिज चौकात पोचले असता एका खासगी बसमधून (सीजी ०८ एवाय ०९१३) प्रवासी उतरत होते. त्यावेळी घोरपडे हा दुचाकी (एमएच २० सीएन ६५२३) आडवी लावून चालक आणि क्लीनरशी वाद घालत असल्याचे दिसले. गस्तीवरील पोलिसांनी मध्यस्थी करत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांना आव्हान देत अंमलदार उबाळे यांची गचांडी धरली. ‘तुम्ही पोलिस आहात की नाही, मला दाखवा’, असे म्हणत शिवीगाळही केली. पोलिसांनी नाव-गाव विचारताच हाताला झटका देऊन तो अंधाराचा फायदा घेत पळून गेला. तरुण पळून गेल्यावर पथक एमआयडीसी सिडको ठाण्यात परतले. तेथे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच, तातडीने शोधमोहीम राबवून रविवारी सकाळी ७ः२० ला एका कंपनीसमोरून घोरपडेला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक लाखनसिंग पचलोरे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Daler Mehndi: 'मद्य पिऊन गाऊ नका..!' उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांना मंचावरच विचारला जाब

SCROLL FOR NEXT