अहमदपूर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
लातूर, ता. २० ः मरशिवणी तांडा (ता. अहमदपूर) येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १० जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत जुगाराचे साहित्य, ९ मोबाइल व रोख रक्कम असा एकूण १ लाख १३ हजार ९७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मरशिवणी तांडा येथील सुरेश सांगवीकर याच्या शेतातील घरात सोमवारी (ता. १९) जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा मारल्यानंतर तेथे काही लोक पैसे घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत व खेळवीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, ९ मोबाइल व रोख रक्कम असा एकूण १ लाख १३ हजार ९७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात मधुकर हरीबा कांबळे (वय ५५ रा. सिद्धार्थ नगर, अहमदपूर), अंकुश रामराव राठोड (वय ३८, रा. मरशिवणी तांडा, ता. अहमदपूर), रामेश्वर वासुदेव मारडकर (वय ४८, रा. विळेगाव, ता. अहमदपूर), दयानंद बाबूराव चव्हाण (वय ३५, रा. कराडनगर, अहमदपूर), चंद्रकांत बाबूराव जाभाडे (वय ४०, रा. बौद्धनगर, अहमदपूर), संतोष गोविंद येमले (वय ४१, रा. लिंगदाळ, ता. अहमदपूर), मोहम्मद सलीम अहमद (वय ५५, रा. हामणे गाव, ता. अहमदपूर), सजाद आसिफ शेख (व ४८, रा. नांदेड रोड, अहमदपूर), जगन्नाथ भागवतराव शिंदे (वय ६२, रा. थोडगा रोड, अहमदपूर) व बालाजी सूर्यकांत बेलाळे (वय ३९ , रा. सराफ गल्ली, अहमदपूर) या संशयितांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.