pradip jaiswal pradip jaiswal
छत्रपती संभाजीनगर

शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड

मे २०१८ मध्ये शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर भागातील दोन आरोपींना अटक केली होती

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: शिवसेनेचे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल (pradip jaiswal) यांनी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि अडीच हजार रुपयांचा दंड केला आहे. ही घटना २०१८ सालची आहे. जैस्वाल यांनी औरंगाबादच्या क्रांती चौकातील पोलिस ठाण्यातील काच फोडून खुर्चीही फेकली होती.

नेमके प्रकरण काय होते?

मे २०१८ मध्ये शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर भागातील दोन आरोपींना अटक केली होती. या आरोपींना पोलिसांनी विनाकारण अटक केली असून त्यांना तात्काळ सोडा, अशी मागणी करत जैस्वाल आपल्या सात ते आठ समर्थकांसह क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेले आणि तिथं तोडफोड केली होती.

अटक केलेल्या दोन कार्यकर्त्यांना सोडा, ही मागणी करत जैस्वाल यांनी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी, अधिकारी यांना धमकावत शिवीगाळ करत टेबलवरी काच फोडली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस.एम.भोसले यांनी जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकी अडीच हजार प्रमाणे पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. जैस्वाल यांनी दंड न भरल्यास शिक्षेत एक महिन्याची वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha: राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे झालेली रिक्त

Mohammed Shams Aalam : भारतीय पॅरा-जलतरणपटूवर लैंगिक छळाचा आरोप; जपानमधून भारतात पाठवले, आजीवन बंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : मराठ्यांचं आंदोलन त्रास देऊन बंद पाडण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Pune News: पुण्यात हवाई पर्यटनाला नवी झेप! हडपसरचे २५० एकरांचे ग्लायडिंग सेंटर बदलणार; हेलिपोर्ट, हवाई साहसी खेळ अन् एव्हिएशन गॅलरी साकारणार

IND vs NZ 1st T20I : वैभव सूर्यवंशी OUT, Kuldeep Yadav ला पण स्थान नाही; दिग्गजाने जाहीर केली भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT