protest in front of police station demand of reduce crime against women  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : पोलिस ठाण्यासमोर ठिय्या; हिंदू तरुणी, महिलांवरील वाढते हल्ले रोखण्याची मागणी

सातारा परिसरासह बीड बायपास, देवळाई भागात हिंदू तरुणी, महिलांची छेड काढणे, त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना काही दिवसांपासून समोर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरासह बीड बायपास, देवळाई भागात हिंदू तरुणी, महिलांची छेड काढणे, त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना काही दिवसांपासून समोर येत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली.

यासंदर्भातील निवेदन देत समाजातर्फे गुरुवारी (ता. सात) सातारा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन तरुणांनी रात्रीच्या वेळी एका तरुणीची छेड काढल्याची घटना घडली होती. हे प्रकरण वाढल्यावर माजी सरपंच फेरोज पटेलसह त्याचा मुलगा आणि १५ ते २० जणांच्या टोळक्याने तरुणीसह तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केला होता.

तरुणीसह कुटुंबीयांना लाकडी दांडे, बेल्टने मारहाण केली होती. आमदार संजय शिरसाट यांना पहाटे दोनला पोलिस ठाण्यात जावे लागले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच बजाज हॉस्पिटलच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर अशाच एका टोळक्याने पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचा हात धरून अरेरावी केली होती. या टोळक्याने तेथेही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

एकामागोमाग घटना घडल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान, या टवाळखोरांवर कारवाई करावी, आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत संशयितांची चौकशी करावी अशा मागण्या सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आल्या.

जवळपास दीडशे ते दोनशे महिला, नागरिक सातारा ठाण्यात गेले. त्यांनी ठाण्यासमोर ठिय्या मांडत कारवाईची मागणी केली. पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे समाजातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT