छत्रपती संभाजीनगर

उमरग्यातील शाळांमध्ये ''वाचन प्रेरणा दिन'' आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात

CD
उमरग्यातील शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा - - ​उमरगा, ता. १६ (बातमीदार) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती गुरुवारी (ता.१५) उमरगा शहरातील विविध शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. - - ​शरणप्पा मलंग विद्यालय शरणप्पा मलंग व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक कविराज रेड्डी, अगतराव मुळे व परमेश्वर सुतार उपस्थित होते. सुतार म्हणाले, की कलाम यांच्या अग्निपंख आत्मचरित्रातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वप्ने प्रत्यक्षात आणावीत. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करून अवांतर वाचनाचा संकल्प केला. - - महात्मा गांधी विद्यालय श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सहशिक्षक व्ही. जी. गायकवाड यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच जागतिक हात धुवा दिनानिमित्त मुख्याध्यापक सोनवणे यांनी विद्यार्थ्यांकडून स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. - - स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ज्येष्ठ शिक्षक गोपाळ आष्टे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. प्रमुख वक्ते महेश कुलकर्णी म्हणाले, आजच्या एआयच्या युगात वाचनालयांकडे दुर्लक्ष होत असले, तरी वाचनामुळे आत्मविश्वास व ज्ञानात भर पडते. यावेळी विद्यार्थ्यांनी अस्खलित मराठी वाचनाचा सराव केला. .......................... ​आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊतून बनवला ‘भूकंप सायरन’ ​आदर्श विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शिक्षिका पल्लवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली थ्री-आर तत्त्वावर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू व विज्ञानाचे प्रयोग बनवण्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. ​या प्रदर्शनात सैफ सय्यद या विद्यार्थ्याने जुन्या बॅटऱ्या, सेन्सर व वायरचा वापर करून भूकंपाच्या बारीक लहरी आधीच ओळखून सायरन वाजवणारे विशेष मॉडेल बनवले, ज्यामुळे जीवितहानी टळू शकते. तसेच सुव्हान पटेल याने झाडाचे जीवन व प्रज्योत बेळंबकर याने सौरमालिका तयार केली. प्राचार्य सैपन शेख, उपमुख्याध्यापक संतोष कांबळे व पर्यवेक्षिका नीलिमा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेचे कौतुक करून त्यांना पारितोषिक दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT