अग्निशमन sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : ‘अग्निशमन’मधील भरतीचा निकाल जाहीर

महापालिकेच्या अग्निशमन विभागातील २९ रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी व शारीरिक तपासणी चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अग्निशमन विभागातील २९ रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी व शारीरिक तपासणी चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना महापालिकेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.

महापालिकेतील १२३ पदांसाठी आयबीपीएस कंपनीमार्फत प्रक्रिया राबविण्यात आली. सुरवातीला अग्निशमन विभागातील २९ जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या ५५ उमेदवारांची यादी तयार करून या उमेदवारांना शारीरिक क्षमता तपासणी चाचणीला बोलावण्यात आले होते.

मंगळवारी विभागीय क्रीडा संकुलात या उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. चाचणी परीक्षेला ४१ उमेदवारांनी हजेरी लावली. या उमेदवारांना शारीरिक क्षमता तपासणी चाचणीमध्ये मिळालेले गुण आणि ऑनलाइन लेखी परीक्षेतील गुण अशा दोन्ही परीक्षेतील गुणांची एकत्रित बेरीज करून हा निकाल जाहीर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT