छत्रपती संभाजीनगर

सातारा-देवळाईत नळजोडणीसाठी धावपळ

CD
सातारा-देवळाईत नळजोडणीसाठी धावपळ -- आतापर्यंत पाच हजारांवर अर्ज दाखल, तीन हजारांहून अधिक घरांना जोडणी -- छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : वर्षानुवर्षे नळाच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या सातारा-देवळाईकरांच्या घरापर्यंत आता नवीन जलयोजनेचे पाणी पोचण्याची आशा निर्माण झाली आहे. मुख्य जलवाहिनीवरील क्रॉस कनेक्शन आणि जलकुंभांपर्यंतची जोडणी पूर्ण होताच नागरिकांनी नळ कनेक्शनसाठी धावपळ सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे पाच ते सहा हजार अर्ज महापालिकेकडे दाखल झाले असून, त्यापैकी तीन हजारांहून अधिक घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. नवीन जल योजनेअंतर्गत ‘नो नेटवर्क’ भागातील नागरिकांना नळजोडणी देण्यासाठी महापालिकेने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली आहे. त्यानुसार, संबंधित मालमत्ताधारकाने मालमत्ता कर भरलेला असणे आवश्यक आहे. कर थकीत असल्यास आधी त्याचा भरणा करावा लागतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह नळजोडणीसाठी अर्ज स्वीकारला जातो. एका नळजोडणीसाठी सुमारे सहा हजार रुपये खर्च येत आहे. यामध्ये प्लंबरचे १,८०० रुपये शुल्क, चालू वर्षाची २,०२५ रुपये पाणीपट्टी, साहित्य व इतर खर्चाचे २,१७५ रुपये यांचा समावेश आहे. नळजोडणीचे काम प्लंबर असोसिएशनमार्फत केले जात आहे. ---- पुढील पाइपचा खर्च नागरिकांवर प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल रहीम आणि उपाध्यक्ष दिलीप बोर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा हजार रुपयांच्या शुल्कात जागेपर्यंत नळजोडणी करून दिली जाते. मात्र, घरापर्यंत पाइप टाकणे आणि त्यासंबंधीचे पुढील काम नागरिकांना स्वखर्चाने करावे लागते. ---- अधिकृत जोडण्यांकडे कल वाढला शहरातील नियमित नेटवर्क क्षेत्रातही नागरिक नळजोडणीसाठी पुढे येत आहेत. पाणीचोरीविरोधातील कारवाई आणि नवीन योजनेतून पाणीपुरवठ्यात होणारी वाढ यामुळे अधिकृत जोडण्यांकडे कल वाढला आहे. या भागात एका कनेक्शनसाठी रस्ता दुरुस्ती, बोअरिंग, पाणीपट्टी आणि प्लंबर शुल्कासह सुमारे १० ते १२ हजार रुपये खर्च येत असल्याचे असोसिएशनने माध्यमांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT