छत्रपती संभाजीनगर

नवदुर्गा : ग्रामीण कन्येची गरुडझेप

CD
साईराणी, यशश्रीची गरुडझेप .......................... अविनाश काळे उमरगा, ता. १९ : ग्रामीण भागात आजही खेळाविषयी अनास्था आणि विशेषतः मुलींच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाबाबत पालकांमध्ये असलेली संकोची मानसिकता यामुळे प्रतिभावान विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रातील प्रमाण अनेकदा मागे पडल्याचे दिसते. मात्र, या सर्व सामाजिक अडचणींवर मात करत जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि खेळातील सातत्य यांच्या बळावर उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील एका सामान्य ग्रामीण कन्येने देदीप्यमान यश संपादन केले आहे. गुंजोटी येथील श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी वर्गात शिकणारी साईराणी विलास व्हटकर हिने पहिल्याच प्रयत्नात ज्युडो स्पर्धेत घवघवीत यश मिळवत थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. - - विभागीय स्पर्धेत प्रथम विभागीय ज्युडो स्पर्धेत साईराणीने अत्यंत आक्रमक आणि तंत्रशुद्ध खेळ करत -४८ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आणि आपले नैपुण्य सिद्ध केले. तिच्या या चमकदार कामगिरीमुळे मुंबई येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा तिचा ठाम मानस आहे. दरम्यान, ग्रामीण भागात गुणवत्तेची कमतरता नसली तरी अनेकदा अपुऱ्या सुविधा आणि मार्गदर्शनाअभावी गुणवंत खेळाडू मागे पडतात. मात्र, साईराणीच्या यशात तिच्या कुटुंबीयांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. वडील विलास व्हटकर यांचे खंबीर पाठबळ आणि आई पार्वती व्हटकर यांचा सततचा पुढाकर यामुळेच साईराणीने या खडतर प्रवासात यश मिळवले. सध्या ती उमरगा येथील तालुका क्रीडा संकुलात आणि साई स्पोर्ट्स क्लबचे क्रीडा मार्गदर्शक प्रताप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कठोर सराव करत आहे. - - यशश्रीचे तलवारबाजीत यश तलवारबाजीसारख्या आव्हानात्मक खेळात ग्रामीण भागातील मुलींनी मारलेली मजल नेहमीच प्रेरणादायी ठरते. तालुक्यातील बेडगा येथील रहिवासी व उमरगा शहरातील श्री महात्मा बसवेश्वर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी यशश्री विक्रम माने हिने तलवारबाजीत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत राज्य व विभागीय स्तरावर देदीप्यमान यश संपादन केले आहे. ​इयत्ता आठवीत असतानाच तलवारबाजीची आवड निर्माण झालेल्या यशश्रीने कठोर परिश्रम व शिस्तीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत पदक पटकावले. तलवारबाजी हा केवळ क्रीडा प्रकार नसून, मुलींच्या स्वसंरक्षणासाठी आणि आपल्या पारंपरिक क्रीडासंस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याचे तिने सिद्ध केले आहे. सध्या तुळजापूर तालुक्यातील आंबू माता कनिष्ठ महाविद्यालय (दिवटी सलगरा) येथे शिक्षण घेणाऱ्या यशश्रीने यावर्षी लातूर विभागीय तलवारबाजी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. ​साईराणी आणि यशश्रीच्या भरारीने ग्रामीण क्रीडा क्षेत्राला शासकीय पाठबळ, आधुनिक क्रीडा सुविधा, साहित्य आणि निपुण मार्गदर्शकांची किती आवश्यकता आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. सोयी-सुविधांचा अभाव आणि पालकांची अनास्था यावर मात करून जिद्दीने कसे उभे राहायचे, याचा वस्तुपाठच तिने घालून दिला आहे. - -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT