Sambhaji Nagar Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : मद्यधुंद दोन तरुणांची भरचौकात तलवारबाजी;सिडको येथे वाहनधारकांत दहशत

मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी सिडको बसस्टँड चौकात दोन्ही हातात तलवार फिरत दहशत निर्माण केली. रविवारी (ता. २३) रात्री ११ वाजता हा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी सिडको बसस्टँड चौकात दोन्ही हातात तलवार फिरत दहशत निर्माण केली. रविवारी (ता. २३) रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. या तरुणांनी वाहनधारकांना तलवारीचा धाक दाखवत दादागिरी केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित रमेश मोरे (वय २२, रा. केंब्रिज चौक), विशाल संजय खरात (वय २०, रा. संजयनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. रोहीत ड्रायव्हर असून विशाल खासगी कंपनीत काम करतो. रविवारी रात्री साडेदहा वाजता रोहित व विशाल दोघे मित्र दुचाकीवरून एपीआय कॅार्नरवर आले.

त्यानंतर दोन तलवारी काढून जालना रोडवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर उगारून दहशत निर्माण करत होते. दोन्ही हातात तलवार घेऊन नाचत होते. नागरिकांनी दोन्ही तरुणांचा व्हिडिओ पोलिसांना पाठवला. घटनेची माहिती मिळताच मुकूंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची कुणकूण लागताच दोघांनी दुचाकीवर धूम ठोकली. एपीआय कॅार्नरवरून चिकलठाण्याकडे पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग केला. दोघांना चिकलठाणा परिसरात ताब्यात घेतले. दोघांवर शस्त्र बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नरसिंग पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT