छत्रपती संभाजीनगर

नांदेडकरांनो, पाणी जपून वापरा!

CD
नांदेडकरांनो, पाणी जपून वापरा! --- कल्याणनगरमध्ये पाणीबचतीचा संदेश देणारा सेल्फी पॉईंट ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. १९ : अल्-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नांदेड शहरासमोर पाणीटंचाईचे आव्हान निर्माण झाले आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करून ऑगस्ट २०२७ पर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर कविता संतोष मुळे यांच्या संकल्पनेतून शहरात पाणीबचतीसाठी जनजागृती केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत तरोडा बुद्रुक येथील कल्याणनगरमधील सार्वजनिक मंडळाने पाणीबचतीचा संदेश देणारा विशेष सेल्फी पॉईंट उभारला आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी या उपक्रमाला भेट देऊन मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामातेची महाआरती केली. तसेच उपस्थित भाविक आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर उमेश पवळे, सतीश देशमुख तरोडेकर, माजी सभापती अमितसिंह तेहरा, सखाराज तुपेकर, नीलेश पावडे, दीपक पाटील, भालचंद्र पवळे, शशिकांत क्षीरसागर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक उपस्थित होते. ---- पाण्याचा थेंब न् थेंब वाचवा यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाणीटंचाईचे संकट आहे. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी आतापासूनच पाण्याचा थेंब न् थेंब वाचविणे आवश्यक आहे, असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. नवरात्रोत्सवात सेल्फी पॉईंटसारख्या आधुनिक माध्यमातून जनजागृती करणे हा उपक्रम उपयुक्त असून, त्याद्वारे तरुणांसह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पाणीबचतीचा संदेश पोहोचण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. कल्याणनगरमधील हा सेल्फी पॉईंट नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. नळ वेळेवर बंद करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे, असे संदेश या माध्यमातून दिले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Latest News : गोकुळमध्ये पुन्हा ट्विस्ट! तीनही माजी अध्यक्ष पिछाडीवर; मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफांना धक्का? सतेज पाटलांचे महायुतीसमोर तगडे आव्हान

टायगर श्रॉफवर अल्पवयीनाकडून गोळीबार, दुसरा हल्लेखोर रॅपिडो ड्रायव्हर कम सुपारी किलर; धक्कादायक माहिती समोर

Manoj Jarange Patil: ‘पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा’; मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका

Latest Marathi News Live Update : गोकुळमध्ये जोरदार उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर

Shoumika Mahadik Gokul Election : गोकुळमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता; शौमिका महाडिक यांचं काय होणार? राजू आवळे, सुजित मिणचेकर यांना समान मते

SCROLL FOR NEXT