ABD26J81640
सवना (ता. सेनगाव) ः यंदा पावसाने दडी मारल्यामुळे हळद पिकाला फटका बसला. शिवारात पावसाअभावी हळदीची वाढ खुंटली आहे. (छाया : अमोल नायक)
----
सवनातील हळद उत्पादक दुहेरी संकटात!
-
आधीच पावसाची दडी, त्यात पुन्हा किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक धोक्यात
----------
सवना, ता. १८ (बातमीदार) : एकीकडे पावसाची दडी, तर दुसरीकडे हळदीच्या कंदांवर किडीचा प्रादुर्भाव अशा दुहेरी संकटात सवना (ता. सेनगाव) परिसरातील हळद उत्पादक शेतकरी सापडले आहेत. उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, हळद पीक वाचविण्यासाठी महागड्या किटकनाशकांचा वापर करावा लागत आहे.
सवना परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून, हळदीचे पीक करपण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी हळदीच्या लागवडीसाठी एकरी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे. सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण आशा हळद पिकावर केंद्रित झाली आहे. अशातच हळदीचे कंद खराब करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गंभीर झाले आहे. महागडी कीटकनाशके फवारूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाची आणि प्रभावी उपाययोजनांची नितांत गरज आहे. मात्र, संकटाच्या काळात कृषी विभागाकडून ठोस मार्गदर्शन मिळणार का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हळद उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
---
कृषी विभागाच्या सल्ल्याची प्रतीक्षा
हळदीचे कंद खराब करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पिकाचे नुकसान होत आहे. महागडी फवारणीची औषधे वापरूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. हळद पीक वाचविण्यासाठी कृषी विभागाने तातडीने शेतावर भेट देऊन किडीचे निदान आणि प्रभावी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.