औरंगाबाद : शहरातील शाळांना मुहूर्त लागेना sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शहरातील शाळांना मुहूर्त लागेना

दहा डिसेंबरनंतर निर्णय अपेक्षित पालक, बालकांसह शिक्षकही अस्वस्थ

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने एक डिसेंबरपासून पहिलीच्या पुढील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. त्याअनुषंगाने ग्रामीण भागात शाळा सुरु झाल्या. मात्र, शहरातील शाळा सुरु करण्यास दहा डिसेंबरनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने कळविले. त्यामुळे पालक, बालक आणि शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत. शाळेत येण्यासाठी अजून किती दिवस वाट पहावी लागणार? असा सवाल विद्यार्थी पालक करीत आहे.

डिसेंबरच्या एक तारखेला शाळा सुरू होणार म्हणून पालकांनी मुलांना गणवेश, नवीन दप्तर खरेदी केले. रिक्षा, स्कूलबस अशा सर्व बाबींची तयारी केली. एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रदीर्घ सुटीनंतर शाळा सुरू होणार असल्याने पालक आणि बालकांबरोबर शिक्षकही समाधानी दिसत होते. मुलांना केंद्रबिंदू मानून शिक्षक कार्यरत असतात. शाळा सुरू झाली पाहिजे, असे सर्वांना वाटत होते. त्याबाबत एकदाचा निर्णय झाला ही बाब सर्वांसाठी समाधानकारक होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने एक तारखेला शाळा सुरु न करता १० तारखेनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असा निर्णय घेतल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. दरम्यान, शाळा प्रशासनाबरोबर स्कूल बस, चालक आणि रिक्षाचालकांनीही स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. बसमधील आसनांची सफाई, बस, रिक्षाची सर्व्हिसिंग केली होती. मात्र, आता ही प्रक्रिया थंडावली आहे.

"घरात बसून मुलं कंटाळली आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु होतात, मग शहरातील का बंद ठेवल्यात? मुलगा तिसरीत गेला आहे, तरी अद्याप त्याने शाळेचे तोंड पाहिले नाही. एक डिसेंबरपासून शाळा सुरु होणार म्हणून सर्व तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी मनपा प्रशासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबविला. त्यामुळे मुलं नाराज झाली."

- विलास जाधव, पालक

"मोबाईलवर ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. मोठा दादा शाळेत दररोज जातो. आल्यानंतर घरात आम्ही एकत्र खेळतो. तेव्हा कोरोना नाही होत का? आम्हाला शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिकता येणारच नाही का? आम्हाला स्वतःची काळजी घेता येते. त्यामुळे शहरातील शाळा लवकर सुरु कराव्या."

- यश काळे, विद्यार्थी इयत्ता सातवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT