rape case  file photo
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद हादरले! दोन महिलांवर दरोडेखोरांनी केले सामुहिक बलात्कार

यातील एक महिला ही पंधरा दिवसांची बाळंतीण आहे, तर दुसरी महिला ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

तोंडोळी (जि.औरंगाबाद) : तोंडोळी (ता.पैठण) गावात दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहार (Bihar) राज्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेले हे दोन दाम्पत्य तोंडोळी गावातील शेतवस्तीवर राहत होते. बुधवारी (ता.२०) पहाटे दीड (Crime In Aurangabad) वाजण्याच्या सुमारास सात दरोडेखोरांनी शेतवस्तीवर दरोडा घालत दोन महिलांवर पाशवी बलात्कार केला. विशेष म्हणजे यातील एक महिला ही पंधरा दिवसांची बाळंतीण आहे, तर दुसरी महिला ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर (Paithan) आली आहे. या दोन महिलांवर तब्बल सात जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

ही घटना घडल्यानंतर औरंगाबादसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. घटना घडून गेल्यानंतर घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. मात्र अजूनही पोलिसांना आरोपींचा मागमूस लागलेला नाही.जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा येथे दाखल झाली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बिडकिन पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली असून जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल तळ ठोकून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT