Theft-crime.jpg 
छत्रपती संभाजीनगर

तब्बल १७ दुचाकी चोरणारे आठ चोर अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई

सुषेन जाधव

औरंगाबाद : पाचोड, शिऊर, करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या ८ चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई २३,२४ आणि २६ ऑगष्टरोजी करण्यात आली. पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून तब्बल १७ दुचाक्या ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली.शिऊर ठाण्याच्या हद्दीतील मनूर येथील संशयित एजाज उर्फ बबलू उल्ताफ मणीयार (पठाण) याच्या जवळ तीन दुचाक्या असून त्याने चोरुन आणल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. तसेच पाचोड हद्दीतील विहामांडवा येथील मुश्ताक रज्जाक शेख, भाऊसाहेब मधुकर ब्रम्हराक्षस यांच्याकडे दोन दुचाक्या तसेच शाम भरत खांडेभराड (१९, रा. चिकणगांव ता. अंबड जि. जालना), विकास ज्ञानदेव मंडलीक (१९), बहिराम ज्ञानदेव काळे (२३, दोघेही रा. बाजार वाहेगांव ता. बदनापूर) यांच्याकडेही चोरीच्या ९ मोटार दुचाक्या आणि अजिंठा हद्दीतील अमोल शंकर सोन्ने, कडूबा सांडू सोन्ने (दोघेही रा. पांगरी ता. सिल्लोड) या दोघांकडे दोन चोरीच्या दुचाक्या असल्याची माहिती खेतमाळस यांना मिळाली होती. दरम्यान खेतमाळस यांनी गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथके तयार करत छापा टाकला.

सव्वा पाच लाखांच्या दुचाक्या जप्त

पोलिसांनी ८ आरोपींच्या ताब्यातून तब्बल ५ लाख २५ हजार रुपयांच्या १७ दुचाक्या जप्त केल्याची माहिती खेतमाळस यांनी दिली. आठही आरोपींविरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दुचाकी चोरीसंदर्भात संशयितांविरोधातील कारवाईचा धडाका यापुढेही असाच सुरु राहणार असल्याचेही खेतमाळस ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले. ही कारवाई निरीक्षक खेतमाळ यांच्या नामदेव सिरसाठ, श्रीमंत भालेराव, बाळू पाथ्रीकर, धिरज जाधव, प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, गजानन लहासे, पोना वाल्मीक निकम, राहूल पगारे, नरेंद्र खंदारे, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे संतोष डमाळे, योगेश तरमाळे, करमाड ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोकडे, एपीआय प्रशांत पाटील, ताराचंद घडे, आनंद घाटेश्वर यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT