छत्रपती संभाजीनगर

शिवप्रसाद जाजू : सकाळ संवाद दिवाळी अंक

CD
((रायझिंग मराठवाडा ः शिवप्रसाद जाजू)) ----- उत्पादन खर्चात चीन, तर गुणवत्तेत जपानचा आदर्श गरजेचा! -------------------------------------------- ((मुख्य इंट्रो)) पवन प्रेसिजन इंडिया प्रा.लि.चे संस्थापक तथा सीईओ आणि सीएमआयएचे माजी अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी १९८४ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून करिअरची सुरवात केली. पुढे शिक्षणाशी संबंधित क्षेत्रातच आयुष्यभर काम करण्याचा निर्धार करून १९८६ मध्ये व्यवसायात प्रवेश केला. आज त्यांच्या कंपनीची उत्पादने भारतातील ग्राहकांपर्यंत पोचली असून जर्मनी, जपान, स्पेन, इटलीसह पाच ते सहा देशांमध्ये निर्यात होत आहे. दुसऱ्या पिढीच्या सहभागामुळे उत्पादनक्षमता वाढली आणि व्यवसायाचे जागतिकीकरण अधिक वेगाने घडले, असे त्यांनी नमूद केले. ---------------------------------------------------- ((कॉमन इन्ट्रो)) भारतात मॅन्युफॅक्चरिंगची मोठी क्षमता असून आयात-प्रतिस्थापन (इम्पोर्ट सब्स्टिट्युशन) हेच भविष्यातील औद्योगिक वाढीचे प्रमुख साधन आहे. राज्यातील उद्योगांनी उत्पादन खर्चाच्या बाबतीत चीनचा आणि गुणवत्तेच्या बाबतीत जपानचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून उत्पादने विकसित करावीत. जेणेकरून भविष्यात अशा उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी मिळू शकते, असे मत पवन प्रेसिजन इंडिया प्रा.लि.चे संस्थापक तथा सीईओ आणि सीएमआयएचे माजी अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी व्यक्त केले. उद्योग, उद्योजकता, निर्यात, कौशल्य विकास आणि शासनाच्या धोरणांवर आधारित विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. ---------- ‘‘आमच्या कंपनीतील ९९ टक्के उत्पादने भारतात पूर्वी तयार होत नव्हती. पण, आम्ही ती स्वतः विकसित करून देशाअंतर्गत उत्पादनाला चालना दिली. ‘चायनीज कॉस्ट आणि जापनीज क्वालिटी’ हाच आमचा मंत्र आहे. हा अनुभव सांगताना उत्पादनाचा खर्च स्पर्धात्मक ठेवत जागतिक दर्जा राखल्यास भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील’’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. - नवीन उद्योजकांसमोरील अडचणी नवीन पिढीतील उद्योजकांसमोर तंत्रज्ञानापेक्षा जमीन, भांडवल, बँकिंग प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता हीच सर्वांत मोठी अडचण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योग सुरू करण्यासाठी तीन ते चार कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक ठरते. बँका ट्रॅक रेकॉर्ड, आयकर विवरणपत्रे आणि आर्थिक पुरावे मागत असल्याने नव्या उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाने परवडणाऱ्या दरात औद्योगिक भूखंड, तयार शेड्स आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी मांडली. चीन, जपानप्रमाणे उद्योग परवानग्या, प्रमाणपत्रे आणि अनुदान मंजुरीसाठी जलद, पारदर्शक आणि ऑनलाइन प्रणाली शासनाने विकसित करावी, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण तरुणांसाठी सुविधा, उद्योग-शिक्षणसंस्थांत समन्वय ग्रामीण भागातील तरुण उद्योगाकडे वळावेत, यासाठी प्रत्येक एमआयडीसीमध्ये मुला-मुलींसाठी परवडणारी वसतिगृहे आणि शेअरिंग निवासव्यवस्था उभारण्याची गरज आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रोजगारनिर्मितीसाठी कौशल्य विकासाला पर्याय नाही. शाळा, महाविद्यालये आणि उद्योग यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ कौशल्य प्रशिक्षण देणे पुरेसे नसून उद्योगाभिमुख मानसिकता विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षणातून प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळाल्यास रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होईल. दुसरीकडे ॲप्रेंटिसशिप ही केवळ औपचारिकता न राहता प्रशिक्षणानंतर स्थिर रोजगार देणारी व्यवस्था उभी राहिली पाहिजे. कर्मचाऱ्यांना पीएफ, ईएसआयसी, ग्रॅच्युइटी आणि रोजगाराची दीर्घकालीन हमी मिळाल्यासच कुशल मनुष्यबळ उद्योगात टिकून राहील, असे त्यांनी सांगितले. --- प्रदर्शनांवरील खर्चासाठी शासनाचे अनुदान गरजेचे एमएसएमई क्षेत्राची सर्वांत मोठी कमजोरी मार्केटिंग असल्याचे नमूद करत त्यांनी उत्पादन तयार करणे पुरेसे नसून ते जगासमोर प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे सांगितले. एखाद्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवण्यासाठी सलग तीन वर्षे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये (एक्झिबिशन) सहभाग आवश्यक असतो. जर्मनी आणि अमेरिकेतील प्रदर्शनांमधूनच कंपनीला मोठे ग्राहक आणि सहकार्य मिळाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. त्यामुळे प्रदर्शनांवरील खर्चासाठी शासनाने अधिक प्रभावी अनुदान योजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. --- शहरात औद्योगिक वातावरण सकारात्मक छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक वातावरण सकारात्मक आहे. लहान-मोठे उद्योजक, औद्योगिक संघटना आणि माध्यमांमध्ये चांगला समन्वय आहे. मात्र, पुढील काही दशकांचा विचार करून औद्योगिक पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, निर्यात प्रोत्साहन आणि नवीन उद्योजकांसाठी सक्षम धोरणात्मक पाठबळ दिल्यास संभाजीनगर देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून अधिक वेगाने विकसित होईल, असा विश्वास जाजू यांनी व्यक्त केला. --- छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग विस्तारास मोठ्या संधी उद्योग केवळ सुरू करून चालत नाही, तर त्याची सातत्याने वाढ करणे आवश्यक आहे. उद्योगाचा विस्तार झाल्यासच रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि स्पर्धात्मकता वाढविणे शक्य होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग विस्तारासाठी मोठ्या संधी उपलब्ध असून, विद्यमान उद्योजकांनी आपला उद्योग अधिक मोठा करावा किंवा नवीन उद्योग उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले. टाटा समूहाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले, की मोठ्या उद्योगांमध्ये करारावरील कामगारांनाही गुणवत्ता चाचणी आणि संधी देण्याची पद्धत आहे. उद्योगांनीही अशा दीर्घकालीन आणि गुणवत्ताकेंद्रित धोरणांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. --- ‘भारतात बनवा, जगभर विका’ हा उद्योगवाढीचा मंत्र ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ या उपक्रमांतून आपण उत्पादनाधारित अर्थव्यवस्थेकडे अधिक वेगाने वाटचाल करणे गरजेचे आहे. बी.जी. शिर्के यांनी मला ‘भारतात बनवा, जगभर विका’ हा मंत्र दिला. भारतात जागतिक दर्जाची उत्पादने तयार करून त्यांची निर्यात वाढविणे हेच उद्योगवाढीचे प्रभावी मॉडेल आहे. ‘स्किल इंडिया’च्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार झाले तर स्थानिक उद्योग जागतिक स्पर्धेत अधिक सक्षम होतील. उत्पादन, गुणवत्ता, कौशल्य आणि निर्यात यांचा समन्वय साधणे हीच औद्योगिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT