छत्रपती संभाजीनगर

सायकलिंग मध्ये राज्यस्तरावर निवड

CD
सिद्धार्थ महाविद्यालयाच्या चार खेळाडूंचे यश जाफराबाद, ता. १७ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धेत सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विभागीय स्तरावर अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत खेळाडूंनी सायकलिंगमधील मास स्टार्ट आणि टाइम ट्रायल या प्रकारांत यश संपादन केले. मुलांच्या गटात ऋतुराज जाधव व राहुल लोखंडे, तर मुलींच्या गटात तृप्ती जाधव व श्रद्धा शिंगणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. हे सर्व खेळाडू अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब मस्के, सचिव प्रा. डॉ. राहुल मस्के, प्राचार्य डॉ. सविता सिनगारे, उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे, सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विनोद हिवराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, लता लोंढे, आरती चिल्लारे, सिद्धार्थ कदम आणि आशिष जोगदंड यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश मालोदे यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. खेळाडूंना प्रा. उदय वझरकर, प्रा. वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य आणि आकाश छडीदार यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरच्या जागी कोण? भारताच्या दिग्गज खेळाडूने भरला फॉर्म; तो रिंगणात उतरलाय म्हणजे बाकीचे OUT...

Baramati Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप; पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत; एकनाथ शिंदेंची घोषणा

Prashant Kishor: 'सम्राट चौधरींना गोळी मारा...' प्रशांत किशोर यांनी खरेच असे विधान केले आहे का?

Numerology: 'तीन तिघाड काम बिघाड' असं का म्हटलं जातं; ३ अंक खरोखरच अशुभ असतो का? पाहा काय सांगते अंकशास्त्र...

SCROLL FOR NEXT