Son-in-law death due to beating by relatives family dispute crime police chhatrapati sambhajinagar esakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar Crime : सासरच्या लोकांनी मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू

भावासोबत वाद का केला असे म्हणून लाकडी दांड्याने मारुन जखमी केले

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : अंबेलोहोळ येथे पती-पत्नीत झालेल्या भांडणाची माहिती माहेरी सांगितल्याने जावयाच्या सासरकडील मंडळींनी ३१ वर्षीय जावयाला रविवारी (ता.९) ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता.१३) मृत्यू झाला.

अंबेलोहोळ येथे रविवारी (ता.९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गीता अनिल पिंपळे व अनिल शालिन पिंपळे या पतीपत्नीत घरगुती वाद झाला होता. या वादाची माहिती गीताने तिच्या आईवडिलांना दिली.

त्यामुळे अनिलचे सासरे संजय लक्ष्मण चव्हाण, सासू पारुबाई संजय चव्हाण, मेहुणा कृष्णा संजय चव्हाण व साडू करण भीमा पवार यांनी अंबेलोहळ येथे येऊन आमच्या मुलीला त्रास का देतो, असे म्हणून ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली.

यात अनिल गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याने जोरजोरात आरडाओरड केल्याने गावातील अफसर अकबर पटेल, सारंग काळे व अशोक उगले यांनी अनिलला त्यांच्यापासून सोडवून उपचारासाठी घाटी दवाखाना येथे दाखल केले.

उपचार सुरू असताना गुरुवारी (ता.१३) अनिल पिंपळेचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी सासरे संजय चव्हाण, सासू पारुबाई चव्हाण, मेहुणा कृष्णा चव्हाण तसेच साडू करण पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली एस डी आधाने करत आहे.

कृष्णा पवारनेही दिली तक्रार

दरम्यान कृष्णा संजय पवार यांनीही वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, बहीण गीता अनिल पिंपळे हिने तिचा पती अनिल पिंपळे हे तिला वारंवार त्रास देत आहे, असे कळविल्याने मी व माझे आई वडील आम्ही गीता हिच्या घरी अंबेलोहळ येथे संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास बहिणीचे पती अनिल यांना समजावण्यास त्यांचे घरी गेलो.

तेथे आमच्या मध्ये बाचाबाची होऊन वाद झाला. तेव्हा मी व माझे आईवडील आम्ही आमचे घरी एकलेहरा येथे परत आलो. त्यानंतर रात्री सुनील शालीन पिंपळे, गणेश शालीन पिंपळे, पप्पू पूनमचंद काळे व निकिता गणेश पिंपळे असे आमच्या घरी आले व आम्हाला सुनील शालीन पिंपळे याने माझे भावासोबत वाद का केला असे म्हणून लाकडी दांड्याने मारुन जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT