sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : पाचोड येथे विद्यार्थ्यास लुटणाऱ्यांना अटक

याप्रकरणी ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या लुटप्रकरणी दोघांना हर्सूल (छत्रपती संभाजीनगर) येथे गजाआड करून सोमवारी पाचोड पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : एका विद्यार्थ्यास फायनान्स कंपनीच्या चौघांनी रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवीत लुटल्याची घटना शनिवारी(ता.२) घडली होती. याप्रकरणी ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या लुटप्रकरणी दोघांना हर्सूल (छत्रपती संभाजीनगर) येथे गजाआड करून सोमवारी (ता.४) पाचोड पोलिसांच्या ताब्यात दिले.

सुदर्शन नंदू पांढरे (वय २८), सागर भाऊसाहेब वाघ (वय २८, दोघे रा.आडूळ) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी (ता.२) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास रुई भारडी (ता.अंबड) येथील शेख रफीक शेख शाबुलाल (वय ३२) हा तरुण चिकलठाणा येथे आरोग्य विभागाची परिक्षा देण्यासाठी दुचाकीवर (क्र.एम.एच-२१ बी.डब्लु-८७०४) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने जात होता. आडूळ (ता.पैठण) बायपासवर थांबलेल्या चौघांनी दुचाकीस हात देऊन थांबविले. यानंतर फायनान्स कंपनीमधून आलो असून देता 'तू आठ हजार दे नाही तर दुचाकी दे'असे म्हणून तरुणास परिक्षेला जाण्यापासून रोखले. यानंतर तो पैसे देत नसल्याचे पाहून त्यांनी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून ४ हजार तीनशे रुपये काढून घेत पोबारा केला.

यानंतर फायनान्स कंपनीमधून आलो असून देता 'तू आठ हजार दे नाही तर दुचाकी दे'असे म्हणून तरुणास परिक्षेला जाण्यापासून रोखले. यानंतर तो पैसे देत नसल्याचे पाहून त्यांनी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून ४ हजार तीनशे रुपये काढून घेत पोबारा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT