छत्रपती संभाजीनगर

स्पर्धा परीक्षांच्या अभ्याससंचांचे वाटप

CD
स्पर्धा परीक्षांच्या अभ्याससंचांचे वाटप नांदेड, ता. २१ : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन जिल्हा सांख्यिकी अधिकारी अर्जुन झाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अभ्याससंचांचे वाटप करण्यात आले. नायब तहसीलदार सुनंदा कऱ्हाळे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत दररोज अवांतर वाचन करून ज्ञानात भर घालावी आणि जीवन समृद्ध करावे, असे आवाहन केले. त्यांनी माहितीच्या अधिकाराबाबतही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी केले. यावेळी डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन तांत्रिक सहायक प्रताप सूर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून एस. के. शहाणे, श्रीनिवास इज्जपवार, संजय पाटील, अजय वट्टमवार, शंकर पवार, रोहित सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदानासाठी कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत

PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार का? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Asian Para Games : नाशिकच्या Dilip Gavitची 'सुवर्ण' धाव! सिमरनने स्पर्धा विक्रमासह जिंकले गोल्ड; भारताचे पदकांचे अर्धशतक...

SCROLL FOR NEXT