छत्रपती संभाजीनगर

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे साखर कारखानदारांची पाठ

CD
ऊस उत्पादकांच्या मागण्यांकडे कारखानदारांची पाठ बीड, ता. १८ (बातमीदार) ः जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या आणि चालू हंगामातील दराच्या प्रश्नावर केज तहसील कार्यालयात आयोजित केलेली संयुक्त बैठक कारखानदारांच्या अनुपस्थितीमुळे निष्फळ ठरली. थकीत बिले न मिळाल्यास व दर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. दुष्काळामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना येडेश्वरी कारखान्याने दर जाहीर न करताच गाळप सुरू केले आहे. शेतकरी प्रतिनिधींनी आरोप केला आहे की, येडेश्वरीकडे गतवर्षीचे प्रतिटन २०० रुपये, गंगामाऊलीकडे ५० रुपये, तर अंबासाखरकडे तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, तहसीलदारांनी वारंवार संपर्क साधूनही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरवली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे आणि संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कारखानदारांसह लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गतवर्षीची थकबाकी तातडीने द्यावी आणि चालू हंगामाचा दर जाहीर करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. यावेळी केशव नाना ढगे, सतीश शिंदे आणि लालासाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते.

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जळगावच्या कुंभारीत पोलीस प्रशिक्षण केंद्र, जामनेरमध्ये मुलींचे वसतिगृह; मंत्री अशोक उइके यांची घोषणा

SCROLL FOR NEXT