छत्रपती संभाजीनगर

कारखानदारांचा लालचीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर

CD
ऊसाला योग्य भाव का नाही? हक्काच्या भावासाठी शेतकरी हक्क मोर्चाचा एल्गार सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १२ : चालू दुष्काळी परिस्थितीत सोयाबीन आणि कापसाचे पीक हातून गेल्याने शेतकरी आधीच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा विदारक स्थितीत निदान ऊस उत्पादक शेतकरी तरी जगला पाहिजे. सध्या देशात साखरेचे भाव गगनाला भिडले असून, ३० ते ३५ रुपये किलोने मिळणारी साखर आज ६० ते ७० रुपयांवर गेली आहे. मात्र, शेतात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या बळिराजाला कारखानदार उसाला योग्य भाव का देत नाहीत? असा संतप्त सवाल शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी उपस्थित केला आहे. कारखानदारांनी नफा कमावण्याची सीमा ओलांडली असून त्यांच्या अमर्याद लालचीपणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम महाराष्ट्रात उसाला चांगला भाव मिळत असताना, मराठवाडा व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मात्र अन्याय का? कारखानदारांनी कागदावरचे घोडे नाचवणे बंद करून लालचीपणा सोडावा, अशी घणाघाती टीका आमटे यांनी केली. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून उसाला पहिला हप्ता ४ हजार २०० रुपये आणि अंतिम हप्ता ५ हजार रुपये देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, बाळासाहेब मोरे, अशोकराव येडे, हनुमानराव घोडके, रामधन जमाले, कॉम्रेड डी. जी. तांदळे, सय्यद सादेक, गणेश वटारे, अशोक सुरवसे, बाजीराव ढाकणे, युनूस शेख, डॉ. संजय तांदळे, सर्फराज पठाण, शेख मोबीन यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR मोहिमेत धक्कादायक प्रकार उघड, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पत्त्यावर २७ मतदारांची नोंद

BAN vs AFG 1st Test: बांगलादेश संघातील 'हिंदू' खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड! कसोटीच्या १७७ वर्षांच्या इतिहासात नोंदवला गेला अनोखा विक्रम

४८० सुपर मार्केटमध्ये सायबर हल्ला, फ्रीज आणि फ्रिजरचं तापमान ५० अंशावर, अनेक ठिकाणी लागली आग

हिच्या भावाने आम्हाला घरी बोलावलं, ३ महिने मी तिला... माधुरीच्या प्रेमात कसे पडले नेने? स्वतः सांगितली लव्हस्टोरी

Numerology: 'या' मूलांकांच्या सुनांसमोर सासूलाही घ्यावी लागते नमती बाजू; सासरच्या घरात चालतो फक्त यांचाच दबदबा!

SCROLL FOR NEXT