छत्रपती संभाजीनगर

पाचट जाळू नका, शेतातच ठेवा!

CD
पाचट जाळू नका, शेतातच ठेवा! ---- पाण्याची बचत, जमिनीची सुपीकता आणि ऊस उत्पादनवाढीसाठी आवाहन ----------- हदगाव, ता. २३ (बातमीदार) : ऊसतोडणीनंतर शेतातील पाचट जाळण्याऐवजी ते शेतातच आच्छादन म्हणून ठेवावे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासह पाण्याची बचत आणि ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाचट व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कारखान्यांकडून करण्यात येत आहे. सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ऊसतोडणीनंतर शेतात पाचट पसरवून ठेवल्यास त्याचा आच्छादन म्हणून उपयोग होतो. यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत होते. तसेच जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. पाचट कुजल्याने जमिनीची सुपीकता वाढते पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास ते कुजून जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासह उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास मदत होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता टिकून राहते. याशिवाय पाचटाच्या आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासही हातभार लागतो. याउलट, पाचट जाळल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सेंद्रिय पदार्थ आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांना हानी पोचू शकते. परिणामी जमिनीची सुपीकता आणि ओलावा टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाचट जाळण्याची प्रथा टाळून त्याचा शेतीसाठी उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ---- ठिबक सिंचनाचा अवलंब करा दुष्काळसदृश परिस्थितीत ऊस पिकाला पाण्याचा ताण बसू नये, यासाठी पाचट आच्छादनासोबत ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. पिकाच्या गरजेनुसार सिंचनाचे नियोजन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाचट व्यवस्थापन आणि पाणी बचतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास ऊस पिकाचे नुकसान कमी करून उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींची माहिती देऊन जमिनीचे आरोग्य जपणे, पाण्याची बचत करणे आणि ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर दोन्ही कारखाना प्रशासनाचा भर असल्याचे सांगण्यात आले. --- कमी खर्चातील प्रभावी उपाय ऊस तोडणीनंतर पाचट जाळण्याऐवजी त्याचे आच्छादन म्हणून व्यवस्थापन करावे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याची बचत, जमिनीची सुपीकता टिकविणे आणि ऊस उत्पादन वाढविण्यासाठी पाचट व्यवस्थापन हा कमी खर्चातील प्रभावी उपाय ठरू शकतो, असे आवाहन शिऊर साखर कारखाना लि. (वाकोडी, ता. कळमनुरी) आणि श्री सुभाष शुगर प्रा.लि., हडसणीचे अध्यक्ष सुभाषराव लालसाहेब देशमुख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded News : नवी दिल्लीतील 'ESTIC 2026' राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विजयकुमार जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड!

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

SCROLL FOR NEXT