Sambhaji Nagar Corporation  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Corporation : महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा चार हजार कोटींचा

महापालिकेचे आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक बुधवारी (ता. सहा) प्रशासक जी. श्रीकांत यांना सादर केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक बुधवारी (ता. सहा) प्रशासक जी. श्रीकांत यांना सादर केले जाणार आहे. यंदा सुमारे चार हजार दोनशे कोटींचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू होती. त्यानुसार बुधवारी दुपारी बारा वाजता प्रशासकांना अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे अडीचशे कोटींची स्पील ओव्हरची कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच २९५ कोटींची नावीन्यपूर्ण कामे असतील. मालमत्ता कराची चालूवर्षाची मागणी व थकबाकी असे सुमारे साडेपाचशे ते सहाशे कोटींचे उत्पन्नाचे उद्दिष्ट असेल.

तसेच नगर रचना विभागाच्या माध्यमातून साडेतीनशे ते चारशे कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट असेल. पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी ८२२ कोटी २० लाख रुपयांचे सॉफ्ट लोन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, त्याचा समावेश देखील अर्थसंकल्पात असेल, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

महाराष्ट्राच्या मंत्र्यांसमोरच संजय दत्तने मराठी बोलण्यास नकार दिला; म्हणाला, ‘६ वर्षे जेलमध्ये राहिलो, तरी... ’

Marathi News Live Updates : आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा - आमदार गोपीचंद पडळकर

भंडारा डोंगरावर एकटी सापडली दीड वर्षांची चिमुकली, पोलिसांकडून आई-वडिलांचा शोध सुरू; मदतीचे आवाहन

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT