Crime News sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : चोरट्यांनी लांबविला साडेचार लाखांचा ऐवज

घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडले. दहा तोळे सोने व रोख ३० हजार रुपये असा चार लाख ५९ हजार ६७६ रुपयांचा ऐवज लंपास केला.

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडले. दहा तोळे सोने व रोख ३० हजार रुपये असा चार लाख ५९ हजार ६७६ रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना वाळूज महानगरातील हरिओम रेसिडेन्सी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

हरिओम रेसिडेन्सी येथील ममता विष्णू देवनाथ (५४) खासगी शिकवणी घेतात. शनिवारी (ता.२२) सकाळीच त्यांचे पती कामावर गेले. तर ममता देवनाथ दुपारी घराला कुलूप लावून शिकवणी घेण्यासाठी बाहेर गेल्या. सायंकाळी शेजारी असलेल्या अश्विनी बनसोडे यांनी घराला कुलूप नसल्याचा माहिती फोनवरून त्यांना दिली. शेजाऱ्यांनी घरात जाऊन बघितले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर ममता देवनाथ यांनी पोलिसांना माहिती देत घराकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले होते.

लग्नासाठीचे दागिने लंपास

चोरट्यांनी दोन्ही कपाटांतील सामान अस्ताव्यस्त फेकले. कपाटातील सोन्याच्या चार बांगड्या, गंठण, चार अंगठ्या, कानातील सहा जोड, गळ्यातील साखळी व ३० हजार रुपये असा चार लाख ५९ हजार ६७६ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी भरदिवसा लंपास केला. ममता देवनाथ यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी दागिने खरेदी केली होती. त्यासाठी आयुष्याची जमापुंजी खर्च केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT