छत्रपती संभाजीनगर

तीन सराईत गुन्हेगारांना ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्ध

CD
तीन सराईत गुन्हेगारांना ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्ध ----- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. २४ : खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र दरोडा आणि अवैध शस्त्रे बाळगण्यासह गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नांदेडमधील तीन सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषध द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या (एमपीडीए) कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार तिघांची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अनिकेत बालाजी सूर्यवंशी (वय २६, रा. दत्तनगर, पोचम्मा मंदिराजवळ, नांदेड), कृष्णा ऊर्फ कांद्या उत्तम सोनटक्के (वय १९, रा. सम्राट अशोकनगर, नांदेड) आणि शेख जुबेर शेख खदीर (वय २४, रा. मुदखेड रोड, वाजेगाव) अशी स्थानबद्ध केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांच्या अभिलेखानुसार, या तिघांविरुद्ध खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैध अग्निशस्त्रे आणि घातक शस्त्रे बाळगणे व त्यांचा वापर करणे, सशस्त्र दरोडा, दरोड्याची पूर्वतयारी तसेच गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे गुन्हे नोंद केले आहेत. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध विविध प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा न झाल्याने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. --- पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश भाग्यनगर, नांदेड ग्रामीण आणि अर्धापूर पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्याकडे पाठविले होते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रस्तावांवरील कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा व प्रतिबंधक कार्यवाही कक्षाने केली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी तिघांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या प्रस्तावांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचे आदेश दिले. -- दीडशेपेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित नांदेड जिल्ह्यात २०२६ या वर्षात आतापर्यंत ३१ सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गुन्हेगारी अभिलेखाच्या आधारे १५० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांविरुद्ध विविध कायद्यांनुसार प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT