छत्रपती संभाजीनगर

चोवीस रेल्वेगाड्यांची तपासणी; ५०६ प्रकरणे नोंदविली

CD
चोवीस रेल्वेगाड्यांची तपासणी; ५०६ प्रकरणे नोंदविली ------ सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. १८ : विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २४ रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकूण ५०६ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, रेल्वे प्रशासनाला ४ लाख ३४ हजार ४९५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या मोहिमेत ३१ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सहायक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांनी मोहिमेचे निरीक्षण केले. तिकीट तपासणी पथकांनी विविध रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करून विनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नियमानुसार कारवाई केली. विनातिकीट प्रवासाच्या ३४१ प्रकरणांतून १ लाख ८४ हजार ८५० रुपये भाडे आणि १ लाख ७० हजार ५५५ रुपये दंड, असा एकूण ३ लाख ५५ हजार ४०५ रुपयांचा महसूल मिळाला. अनियमित प्रवासाच्या ८३ प्रकरणांतून २२ हजार ६४० रुपये भाडे आणि ४१ हजार ५०० रुपये दंड, असा एकूण ६४ हजार १४० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. याशिवाय, अन्य अनियमिततेच्या ८२ प्रकरणांतून १४ हजार ९५० रुपयांचा महसूल मिळाला. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. विनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध भविष्यातही अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra History: पावणेदोनशे वर्षांपासून दुर्लक्षित समाधीचा शोध! सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार यांची कबर सापडली; इतिहासप्रेमींना मोठे यश

RANJI TROPHY: न्यूझीलंड दौऱ्याआधी शुभमन गिलचा रणजीत फ्लॉप शो! १ रनवर बोल्ड करणारा अजय मंडल आहे तरी कोण?

Kanya Puja Importance: अष्टमीला कन्या पूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि पूजेची परंपरा

Latest Marathi News Live Update : अंकिता भंडारी हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा यासाठी पाटियाला कोर्टाबाहेर निदर्शने

Pune Crime: पुण्यात भरदिवसा घरफोडी! बंद फ्लॅटमधून ४ लाख ८ हजारांचा ऐवज चोरीला

SCROLL FOR NEXT