छत्रपती संभाजीनगर

कारचा टायर फुटल्याने झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

CD
टायर फुटल्याने कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी -------------------- पाथरी-मानवत मार्गावर अपघात मानवत, ता.२१ (बातमीदार): पाथरीकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणास कारने धडक दिल्याची घटना बुधवारी (ता.२१) सकाळी ११:१५ च्या सुमारास घडली. रत्नापूर टोल नाक्याजवळ मानवतकडून येणाऱ्या कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. बालाजी रमेश रेंगे (वय २१, रा. कानसूर, ता. पाथरी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. बालाजी रेंगे हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम एच-२२ एइ- ३२२९) मानवतच्या दिशेने येत होते. याचवेळी पाथरीच्या दिशेने जाणारी कार (क्र.एमएच २० सी एच ५४७७) रत्नापूर टोल नाक्याजवळ पुढे आली असता, अचानक कारचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार बालाजी रेंगे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मानवत पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; राजेंद्र शिंदेंची सहा तास चौकशी

Velhe News : किल्ले राजगडवर 'मर्दानी दसरा' संपन्न; राजगडावर शेकडो दुर्ग सेवकांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT