छत्रपती संभाजीनगर

मानाच्या पालख्या, रात्रभर छबिना अन् भक्तीचा पूर, तुकाई देवीची यात्रा उत्साहात

CD
मानाच्या पालख्या, रात्रभर छबिना अन् देवीचा जयघोष शेवगाव येथील तुकाई देवीची यात्रा उत्साहात, भाविकांची दर्शनासाठी रीघ गौर, ता. २५ ः मानाच्या पालख्या, रात्रभर निघालेला छबिना अन् देवीमातेचा जयघोष अशा भारलेल्या वातावरणात कोजागरी पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर शेवगाव येथील तुकाई देवीचा यात्रोत्सव पार पडला. देवीच्या दर्शनासाठी दरबारात पुन्हा एकदा भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गौर, भोसा आणि शेलगाव परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात हा सोहळा रंगला. स्थानिक परंपरेनुसार थोरवे आणि सुतार यांच्या मानाच्या पालख्यांचे आगमन झाल्यानंतर यात्रेला सुरवात झाली. यानंतर भोसा आणि शेलगाव येथील पालख्याही तुकाई देवीच्या दरबारात दाखल झाल्या. ‘आई राजा उदो उदो’ आणि ‘येडेश्वरीचा उदो उदो’ च्या गगनभेदी जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यात्रेनिमित्त गौरसह आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या यात्रेनंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पालख्या आपापल्या गावांकडे रवाना झाल्या. गावात पालख्यांचे आगमन झाल्यानंतर रात्री जागरण करून पारंपरिक छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. ------ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले हे स्थान उपेक्षित राहू नये, यासाठी तुकाई देवीच्या या स्थानाला शासनाने तातडीने तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ........ गौर ः शेवगाव (दि.) येथील तुकाई देवीचा वार्षिक यात्रा सोहळ्यानिमित्त दाखल झालेली पालखी. यावेळी उपस्थित भाविक. (दुसऱ्या छायाचित्रात) तुकाई देवीची मुर्ती. ... फोटो ःOSM26B07274, OSM26B07275

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

Pune Water Shortage: कोंढव्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी बंद; पाणीपट्टी भरूनही नागरिकांची पाण्यासाठी प्रतीक्षा

Hingoli Crime विहिरीच्या पाण्याचा वाद, पुतण्यानं काकाला शेतात संपवलं, नंतर काकूची दारवाजातच हत्या

Sugarcane Crop Fire: डीपीच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक; साडेचार लाखांचे नुकसान, बेलगाव येथील शेतकऱ्याला आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT