छत्रपती संभाजीनगर

हळदीला २५ हजारांचा भाव; सोयाबीनही सात हजारांवर

CD
पान ३ मेन हळदीला २५ हजारांचा भाव; सोयाबीनही सात हजारांवर दरवाढीचा लाभ मोजक्याच शेतकऱ्यांना, कमी उत्पादनामुळे उत्पन्नवाढीवर मर्यादा --------------- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. २२ : नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दराने मोठी उसळी घेतली असून, हळद काडीला प्रतिक्विंटल २५ हजार ५ रुपये, तर सोयाबीनला ७ हजार १५ रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हळदीसह अन्य शेतमालाच्या दरात सुधारणा होत असली, तरी बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला शेतमाल विकला आहे. त्यामुळे या दरवाढीचा प्रत्यक्ष लाभ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, बाजारातील दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुधवारी (ता.२१) बाजार समितीने जाहीर केलेल्या भाव तक्त्यानुसार, हळद काडीला प्रतिक्विंटल कमाल २५ हजार ५ रुपये, किमान २० हजार ३०० रुपये, तर सरासरी २२ हजार २९५ रुपये भाव मिळाला. हळद गोळ्याला कमाल २२ हजार १६० रुपये, किमान १८ हजार ४५० रुपये, तर सरासरी २० हजार ३५० रुपये भाव नोंदविण्यात आला. हळद तुकडीला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये भाव मिळाला. सोयाबीनच्या दरातही सुधारणा झाली असून, त्याला प्रतिक्विंटल कमाल ७ हजार १५ रुपये, किमान ६ हजार ४२५ रुपये, तर सरासरी ६ हजार ८५० रुपये भाव मिळाला. याशिवाय मुगाला प्रतिक्विंटल ८ हजार ४०० रुपये, हरभऱ्याला ६ हजार ६०० रुपये, तर गव्हाला कमाल ३ हजार ३४५ रुपये भाव मिळाला. दरवाढीचा लाभ कोणाला? काही दिवसांपूर्वी हळदीचे दर प्रतिक्विंटल १२ ते १४ हजार रुपयांच्या आसपास असताना, आर्थिक गरजेतून अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकला. त्यामुळे आता दरात मोठी वाढ झाली असली, तरी आधीच विक्री केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. सध्या बाजारात हळद व अन्य शेतमालाचा साठा असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे दरवाढीचा फायदा प्रामुख्याने शिल्लक साठा असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी सोयाबीनचे उत्पादन घटले यंदा पावसातील अनियमितता आणि पाणीटंचाईमुळे सोयाबीनच्या शेंगा व्यवस्थित भरल्या नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पादन आले नाही, तर काहींच्या सोयाबीनचा उतारा मोठ्या प्रमाणात घटला. त्यामुळे सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असला, तरी उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता कमी आहे. एकीकडे बाजारभावात वाढ होत असताना दुसरीकडे घटलेले उत्पादन आणि आर्थिक गरजेतून यापूर्वीच केलेली विक्री, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Water Supply: ठाणे जिल्ह्यात जलसंकटाचे सावट! तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागात कधी पाणीबाणी?

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

SCROLL FOR NEXT