Accident News sakal
छत्रपती संभाजीनगर

Accident News : दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक ठार, चार जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार, तर चार जखमी जखमी झाले आहेत. ही घटना गौरपिंप्री (ता कन्नड ) शिवारात रविवारी (ता.३ ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

नाचनवेल : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार, तर चार जखमी जखमी झाले आहेत. ही घटना गौरपिंप्री (ता कन्नड ) शिवारात रविवारी (ता.३ ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

गणेश संतोष चौधे (वय १९, रा मोहाडी, ता कन्नड ) असे मृताचे नाव आहे. तर सचिन भानुदास आव्हाळे व महेश एकनाथ आव्हाळे, सचिन आव्हाळे, महेश आव्हाळे (सर्व रा. हस्ता, ता. कन्नड) हे जखमी झाले. सध्या त्यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.

दुचाकी (एमएच २० एच ७१९५) व (एमएच २०/५९२) दोन्ही दुचाकींची गौरपिंप्री (ता.कन्नड ) शिवारातील गौरपिंप्री-निधोना रस्त्यावर धडक झाली. यातील जखमींना तत्काळ फुलंब्री घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी शेख तस्लीम यांनी तपासून गणेश संतोष चौधे याला मृत्यू घोषित केले.

पिशोर पोलिस ठाण्यात आपघाताची नोंद करण्यात आली. मृताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण व आजी आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार वसंत पाटील हे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना अमेरिकेतून पाठिंबा

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT