छत्रपती संभाजीनगर

अनाधिकृत बांधकामाला महापालिकेचे अभय

CD
तोडफोड केलेला फ्लॅट ‘जैसे थे’ -- अनधिकृत बांधकामाला महापालिकेचे अभय -- शहानूरवाडी, ता. १६ : अपनानगर येथील इमारतीमधील अनधिकृत बांधकामाची महापालिकेने अर्धवट पाडापाडी केली होती. मात्र, त्यानंतर संबंधिताने ते बांधकाम पुन्हा ‘जैसे थे’ केले. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेजाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही ‘अतिक्रमण हटाव विभाग’ टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, शहानूरवाडी, अपनानगर येथील ‘हिमांशू प्राइड’ (नेहा कन्स्ट्रक्शन) या इमारतीतील फ्लॅट क्रमांक १४ च्या मालक तृप्ती रमेश वाईकर यांनी स्वतःच्या फ्लॅटला लागून असलेल्या टेरेसवर विनापरवाना बांधकाम केले होते. तृप्ती भोपे-वाईकर या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि शासकीय तंत्रनिकेतन, छत्रपती संभाजीनगर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. हे अनधिकृत बांधकाम करताना भिंत पाडण्यासाठी ब्रेकर मशीन वापरल्याने अपार्टमेंटला अनेक ठिकाणी तडे गेले. त्यामुळे सात फ्लॅटमध्ये पाणी गळती होत आहे. याविरोधात फ्लॅटधारकांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर २७ फेब्रुवारीला महापालिकेने केवळ एकच भिंत पाडली. परंतु, त्यानंतर वाईकर यांनी पुन्हा त्याच जागेवर पूर्ववत बांधकाम केले. याप्रकरणी फ्लॅटधारक नयन पाटील यांनी पुनश्च तक्रार दाखल केली आहे. मात्र, अतिक्रमण विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत, असा आरोप पाटील यांनी केला. --- ((((कोट))) महापालिकेने याप्रकरणी पूर्वी कारवाई केली होती. त्यानंतर वाईकर आणि पाटील यांनी आपापसात प्रकरण मिटवून घेतले होते. आता पुन्हा तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार जागेची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. - सविता सोनवणे, उपायुक्त, अतिक्रमण हटाव विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

YUZVENDRA CHAHAL: लग्न तुटल्यानंतर चहलला पॅनिक अटॅक, दारूचं व्यसनही जडलं! २६ दिवस रिहॅबमध्ये काय घडलं?

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

SCROLL FOR NEXT