UPSC Student Esakal
छत्रपती संभाजीनगर

UPSC Student: गुगल मॅपमुळे UPSC परिक्षेपासून वंचित! 3 मिनीटं उशिराने पोहचल्यानं प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar UPSC Student: छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गेटवर 2 ते 3 मिनिटे उशिरा आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुगल मॅप लोकेशनमुळे अनेक विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षानुवर्ष अभ्यास करून आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या परिक्षेसाठी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. यावेळी दुरवरून परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी संतापही व्यक्त केला आहे.

आज संपूर्ण देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरू होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गेटवर 2 ते 3 मिनिटे उशिरा आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यानंतर या विद्यार्थिनींना अश्रू आनावर झाल्याच पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर दिलेल्या कॉलेजचा पत्ता विद्यार्थ्यांनी गुगल मॅपवर टाकल्याने गोंधळ झाला असल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे. गुगल मॅपवर या कॉलेजचे नाव वाळूज पंढरपूर येथे असल्याचेही दाखवत असल्याने हे विद्यार्थी वाळूज पंढरपूरला गेले होते. मात्र तिथं हे कॉलेज अस्तित्वात नाही आणि कुठलीही परीक्षा देखील चालू असल्याचा निदर्शनास आले नाही असा विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.

गुगल मॅप लोकेशनमुळे हा गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. संभाजीनगरमधील विवेकानंद महाविद्यालयामध्ये २ ते ३ मिनीटे उशिरा आल्यामुळे प्रवेश नाकारला आहे. अनेक महिने अभ्यास करून परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. प्रवेश पत्रिकेवर दिलेला पत्ता गुगल मॅपवरती तपासल्याने तो वेगळ्या ठिकाणी दाखवत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा सर्व गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT