छत्रपती संभाजीनगर

ईव्ही बॅटरीसाठी व्हरॉक, फोरसी पॉवरची भागीदारी

CD
ईव्ही बॅटरीसाठी व्हेरॉक, फॉर्सी पॉवरची भागीदारी तीनचाकी वाहनांपासून सुरवात ः दुचाकी, बस आणि ट्रकसाठीही बॅटरी पॅक विकसित करणार छत्रपती संभाजीनगर, ता. १८ ः इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड आणि फ्रान्सच्या फॉर्सी पॉवर एसए या कंपन्यांनी संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. या व्यवहाराअंतर्गत व्हेरॉक फॉर्सी पॉवर इंडियामध्ये ४५ टक्के भागभांडवल घेणार आहे. कंपनीचे व्यवस्थापन आणि परिचालन नियंत्रणही स्वतःकडे ठेवणार आहे. या प्रस्तावाला आवश्यक नियामक आणि कंपनीविषयक मंजुरी मिळणे बाकी आहे. संयुक्त उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांसाठी बॅटरी पॅक विकसित केले जातील. त्यानंतर दुचाकी, हलकी व्यावसायिक वाहने, बस, ट्रक तसेच औद्योगिक वाहनांसाठीही बॅटरी प्रणाली विकसित करण्याची योजना आहे. या उपक्रमाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी व्हेरॉक ऐच्छिक रूपांतरित आणि परतफेडयोग्य प्राधान्य समभागांतही गुंतवणूक करणार आहे. व्हेरॉककडे वाहन अभियांत्रिकी, उत्पादन आणि वाहन उत्पादक कंपन्यांशी असलेले व्यावसायिक संबंध आहेत. तर फॉर्सी पॉवरला बॅटरी पॅक आणि ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याचा अनुभव आहे. या दोन्ही कंपन्यांच्या तांत्रिक आणि उत्पादनविषयक क्षमतांचा एकत्रित वापर करून विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी गरजेनुसार बदल करता येतील, अशी बॅटरी प्रणाली विकसित करणार आहेत. व्हेरॉक ही वाहनांचे दिवे, इलेक्ट्रॉनिक्स, बॉडी सिस्टिम्स आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीसह विविध वाहन घटकांचे उत्पादन करणारी जागतिक कंपनी आहे. फॉर्सी पॉवर व्यावसायिक आणि औद्योगिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी प्रणाली विकसित करते. या भागीदारीमुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी स्थानिक पातळीवर बॅटरी पॅक विकसित करण्याच्या क्षमतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यातील मोबिलिटीसाठी महत्त्वाचे पाऊल : अर्जुन जैन या भागीदारीविषयी व्हेरॉकचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन जैन म्हणाले, देशात फॉर्सी पॉवरसोबतची ही भागीदारी बॅटरी तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेला एका छताखाली आणेल. यामुळे प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनातील व्हेरॉकचा हिस्सा वाढण्यास मोठी मदत होणार आहे. व्यावसायिक वाहनांपर्यंत विस्तारू : क्रिस्टोफ गुर्टनर फॉर्सी पॉवरचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टोफ गुर्टनर म्हणाले, भारतात ईव्ही क्रांती वेगाने होत असून बॅटरी सोल्युशन्सचा विस्तार करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. व्हेरॉकच्या स्थानिक औद्योगिक ताकदीचा आणि उत्पादन क्षमतेचा लाभ घेत, आम्ही तीनचाकीपासून व्यावसायिक वाहनांपर्यंतच्या श्रेणीत विस्तार करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत शेतकऱ्यांच्या जीवन संपविण्याचे सत्र सुरूच; २५ दिवसांत १४ जणांनी संपवले जीवन

'आंब्यावानी नाव तुझं गोड बाई,जोगवा वाढ माई' गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर डान्स; हावभाव पाहून नेटकरी म्हणाले-

SCROLL FOR NEXT