छत्रपती संभाजीनगर

वक्फच्या चक्क ३४ एकरांवर डल्ला

CD
वक्फच्या तब्बल ३४ एकर जमिनीवर डल्ला? सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १९ : माजलगाव तालुक्यात वक्फ मालमत्तेवर चक्क ३४ एकरांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मौजे निपाणी टाकळी आणि खरात अडगाव येथील अब्जावधी रुपयांच्या मौल्यवान जमिनी बोगस कागदपत्रे आणि खोट्या वारस प्रमाणपत्रांच्या आधारे भूमाफियांनी लाटल्या आहेत. या प्रकरणी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी तक्रार देऊनही माजलगाव ग्रामीण पोलिसांनी महिनाभर कोणतीही कारवाई केलेली नाही. शासनाच्या राजपत्रात नोंद असलेल्या दर्गाह शाहीन-शाह वली व मशिदीच्या मालकीची निपाणी टाकळी येथील १५ एकर (गट क्र. २१०) आणि खरात अडगाव येथील २४ एकर ९ गुंठे (गट क्र. १३५) जमीन बळकावण्यात आली आहे. २०१७ ते २०२५ या कालावधीत बोगस मृत्यूपत्र व वारस प्रमाणपत्रे तयार करून सुमारे ३४ एकरांवर बेकायदेशीर हस्तांतरण व खरेदी-विक्री करण्यात आली. या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा वक्फ अधिकारी तौफीक अहमद यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली होती; परंतु, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेत, २५ ऑक्टोबरपर्यंत गुन्हे दाखल न केल्यास २६ ऑक्टोबरपासून पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. ----- वक्फ अधिकाऱ्यांनी पुराव्यांसह फिर्याद देऊनही महिनाभर गुन्हा दाखल न होणे संशयास्पद आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक न केल्यास २६ ऑक्टोबरपासून आम्ही पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू. पुढील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी प्रशासन जबाबदार राहील. - सादिक इनामदार, अध्यक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

Gold For India : अचूक निशाणा अन् नवा इतिहास! पॅरा नेमबाज मोना अग्रवालने जिंकलं 'सुवर्णपदक'; पंतप्रधानांची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update : बंटी पाटलांचा महायुतीला दणका! गोकुळ दूध संघ निवडणुकीत समविचारी आघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Asian Para Games 2026: भारतीय खेळाडूंचा ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण व रौप्य पदकांचा 'डबल धमाका'! सौम्या, राधा अन् रिंकू-अजीतची कमाल

SCROLL FOR NEXT