छत्रपती संभाजीनगर

ऑक्टोबर हिटचा तडाखा; कळंब तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद! १८ गावांना ४१ अधिग्रहित जलस्रोतांचा आधार; विहिरी, बोअर आटू लागल्याने ग्रामीण भागाची चिंता वाढली

CD
विहिरी आटल्या, बोअरवेलची पाणीपातळी घटली कळंब ः टंचाईचे संकट गडद; अठरा गावांसाठी ४१ अधिग्रहण कळंब, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून, ऑक्टोबरमधील वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. विहिरींची पाणीपातळी खालावत असून बोअरवेल कोरडे पडू लागले आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. तालुक्यातील १८ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तब्बल ४१ जलस्रोत अधिग्रहित करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, आता उपलब्ध पाणीसाठ्यांवरही संकट निर्माण झाले आहे. ऑक्टोबरमधील उन्हाच्या तडाख्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. त्याचा परिणाम विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीवर होत आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने नागरिकांना पर्यायी व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. आगामी काळात टंचाई आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाणीटंचाई तीव्र होण्यापूर्वी प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. टंचाईग्रस्त गावांतील पाणीपुरवठ्याचा नियमित आढावा घेणे, जलस्रोतांची स्थिती तपासणे, गरजेनुसार टँकर उपलब्ध करून देणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे गरजेचे आहे. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना ग्रामीण नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपायांबरोबरच आगामी टंचाईचा सामना करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. ........................ ((चौकट)) अठरा गावांसाठी ४१ अधिग्रहण तालुक्यातील आढाळा (१), बोरवंटी (२), शेलगाव (३), मोहा (६), जवळा खुर्द (१), माळकरंजा (१), सापनाई (३), वडगाव (शि.) (१), मंगरूळ (२), सात्रा (१), खामसवाडी (१०), उमरा (१), एकुरका (२), शेळका धानोरा (१), सौदणा ढोकी (१), आडसुळवाडी (२), हासेगाव (के.) (१) आणि गंभीरवाडी (१) या गावांमध्ये एकूण ४१ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत. उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास या स्रोतांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे.

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

SCROLL FOR NEXT