एक कोटी तीस लाखांचा टंचाई कृती आराखडा
-----------------
मानवत तालुक्यातील ३७ गावांचा समावेश; ३९ उपाययोजना प्रस्तावित
मानवत, ता.१६(बातमीदार) : आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाने कंबर कसली असून एक कोटी ३० लाख रुपये खर्चाचा विशेष पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. या नियोजनामुळे तालुक्यातील ३७ गावांचा समावेश असणार आहे
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ग्रामीण भागात पाण्याचा कोणताही तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने आधीपासूनच नियोजन सुरू केले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी संयुक्तपणे या विशेष आराखड्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या आराखड्यात ३९ विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
((चौकट)))
अधिग्रहणासाठी आठ लाखांची तरतूद
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता १३ गावांतील १५ खासगी विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करण्यासाठी ८.१० लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. गरज भासल्यास टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तीन लाखांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. यात प्रामुख्याने बोंदरवाडी, खडकवाडी, पाळोदी, सोनुळा करंजी, सावंगी, खरबा, हात्तलवाडी, पिंपळा, आंबेगाव आदी गावांचा समावेश आहे.
(((चौकट))))
गावांसाठी आवश्यकतेनुसार निधी
प्रस्तावित आराखड्यात विविध गावांसाठी आवश्यकतेनुसार निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार
हत्तलवाडी व मानोली प्रत्येकी १० लाख रुपये, पाळोदी, टाकळी नि., पोहंडूळ, शेवडी जा. प्रत्येकी ८ ते ९ लाख रुपये, सावंगी मगर, मंगरूळ पा.प., हटकरवाडी: प्रत्येकी ७ लाख रुपये
कोल्हावाडी : एक लाख रुपये, भोसा, बोंदरवाडी, देवलगाव आवचार, केकरजवळा, खरबा, रत्नापूर, सावळी, ताडबोरगावात नवीन विंधन विहिरी (बोअरवेल) घेणे व खासगी जलस्रोतांचे अधिग्रहण हि कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.
--------------------
((चौकट)))
नवीन विंधन विहिरींसाठी अनुदान
आराखड्यातील प्रमुख उपाययोजना, प्रस्तावित नियोजनानुसार करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील १२ गावांत नळ योजनाच्या दुरुस्तीसाठी ८४ लाख रुपयाचा निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. नवीन विंधन विहिरी (बोअरवेल) १२ गावांमध्ये नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी ८.८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.