Sambhaji Nagar Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : ऊसतोडणीच्या वादातून महिलेचा खून ; ब्रम्हगाव येथील घटना,पोलिसांकडून तरुणास अटक

तीन महिन्यांपूर्वी ऊसतोडणीच्या कामासाठी पाचोड (ता.पैठण) परिसरात आलेल्या महिलेस तरुणाने बेदम मारहाण केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सदर तरुणाविरुद्ध पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : तीन महिन्यांपूर्वी ऊसतोडणीच्या कामासाठी पाचोड (ता.पैठण) परिसरात आलेल्या महिलेस तरुणाने बेदम मारहाण केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सदर तरुणाविरुद्ध पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.१५) पोलिसांनी सदर तरुणास अटक केली. रेणुका भीमराव सुरुशे (वय ४५, रा.आंबेडकरनगर ता.मेहकर जि.बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर विक्की ऊर्फ संतोष यशवंत राऊत (रा.मेहकर (जि.बुलडाणा) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

पाचोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जवळपास तीन महिन्यांआधी सदर महिला आणि आरोपी गावांतील आठ -दहा जण ऊसतोडीसाठी ब्रम्हगाव (ता.पैठण) शिवारात आले होते. त्यांची टोळी ऊस तोडण्यासाठी येथील शेतकरी गोपाल जगताप यांच्या शेतात वास्तव्यास असताना मृत महिलेने घरी असलेल्या मुलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, आरोपीने ऊसतोडणीच्या कामासाठी उचल घेतलेली रक्कम फिटेपर्यंत जायचे नाही असे सांगितले. या कारणावरून या दोघांमध्ये भांडण झाले. यामुळे मंगळवारी (ता.६) संतोष राऊतने रागाच्या भरात रात्री आठच्या सुमारास सदर महिलेला लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली.

यामुळे सदर महिला गंभीर जखमी झाली. त्याच अवस्थेत महिलेला उपचाराविना झोपडीत सोडून देण्यात आले. या घटनेची माहिती शेतमालक जगताप यांना समजली असता त्यांनी आरोपीला भाड्याने वाहन करून दिले. त्यानंतर सदर महिलेस गावी पाठविले. या घटनेची माहिती महिलेच्या मुलाला कळताच त्याने नातेवाइकांना सोबत घेत संतोष राऊतचे घर गाठले. तेव्हा आई बाकावर बेशुद्ध अवस्थेत दिसून आली.

मुलगा आकाश सुरुशे याने आईला मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून बुलडाण्याला पाठविले. तेथून परत अकोला व नागपूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असता त्याठिकाणी उपचारांदरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत ऊस तोडकामगार महिलेचा मुलगा आकाश सुरुशे याने पाचोड पोलिस गाठून बुधवारी (ता.१४) फिर्याद दिली. यावरून सपोनि. शरदचंद्र रोडगे यांनी सदर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs DC Live: दिल्लीच्या १५ धावांत ४ विकेट्स! सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल, गुरजपनीतचा पहिल्याच चेंडूवर विक्रम; Video

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

IAS Sandeep Rathod News: तुळशीचे भूमिपुत्र आयएएस संदीप राठोड केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त; माहूर तालुक्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Chh. Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर स्विफ्ट कारची ट्रॅक्टरला भीषण धडक; महिलेचा हात फ्रॅक्चर, एक जखमी

SCROLL FOR NEXT