Crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : 20 वर्षे काम करून साठवलेल्या 3 लाखांची फसवणूक; PSIचा महिलेला फाशी घेण्याचा अजब सल्ला

एटीएम कार्डाची आदलाबदली करून आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली पण...

सकाळ डिजिटल टीम

वाळूज महानगर : एटीएम कार्डाची आदलाबदली करून आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली, मात्र वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकाने या महिलेचे समाधान करून न्याय मिळवून देण्याऐवजी उलट तिला ठाण्यातच फाशी घेण्याचा अजब सल्ला दिला. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की रांजणगाव (शेणपुंजी) येथील चौत्रा अंकुश रेखाडगेवाड या 7 जुलै रोजी गावातीलच सावता महाराज मंदिराजवळील एसबीआय बँकेच्या एटीम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. तेथे एका चाळीस वर्षीय इसमाने तिला दहा हजार रुपये काढून दिले. त्यानंतर त्याने हातचलाखी करून एटीएम कार्डाची आदलाबदली करून दुसरेच कार्ड दिले.

दरम्यान, त्या भामट्याने चैत्रा रेखाडगेवाड यांच्या एटीएम कार्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएम मधून रेखाडगेवाड यांच्या खात्यातील शिल्लक असलेले सर्वच 2 लाख 90 हजार रुपये काढून घेऊन खाते रिकामे केले. दरम्यानच्या काळात चौत्रा ही परभणी येथे गावी गेली. तेथे कार्डमधून पैसे काढण्यास गेली असता पैसे निघत नव्हते. त्यामुळे एटीएम कार्डची पाहणी केली असता, हे कार्ड नरवडे यांच्या नावाचे असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेत तसेच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांचा अजब सल्ला

वीस वर्षे काबाकष्ट करून जमा केलेली रक्कम गेल्याने हवालदिल झालेल्या महिलने पैसे परत मिळावे. यासाठी पोलीस ठाण्यात दोन महिने चकरा मारल्या. मात्र पैसे मिळवून देण्यासाठी तपास करण्याऐवजी उलट महिलेलाच दमदाटी करत चालढकल केली. या महिलेच्या म्हणण्यानुसार 'साहेब माझे सर्व पैसे गेले, आता मला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही' असे म्हणाली असता पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे सदर मोहिलेला म्हणाले की, 'आत्महत्या करायचीच असेल, तर येथेच कर, दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे' असा अजब सल्ला दिल्याचे तिने सांगितले.

भ्रष्टाचाराने बरबटले पोलीस ठाणे

वाळूज औद्योगिक वसाहतीत प्रत्येक राज्यातील नागरिक कामगार म्हणून स्थायिक झालेला आहे. अनेकांचा ओघ सुरू आहे. त्यातील सर्वांनाच काम मिळत नसल्याने त्यांचा अवैध धंद्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीही वाढली आहे. शिवाय पोलीसांची हफ्तेखोरी, पोलिसांच्या याच हप्ते खोरीमुळे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे भ्रष्टाचाराने बरबटले आहे. या संदर्भात विधानसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात येऊन येथील पोलीस अधिकारी कसे हप्ते खोरी करतात. त्याचा पाढाच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT