Ajmer Police Station esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : "तू कोणासोबत बोलत होतीस" अशी विचारणा करत जीमहून परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग

पिडीतेच्या दोघा मित्रांनाही त्याने ‘तुम्ही इथेच थांबा, मी माझ्या भाई लोकांना बोलावून तुम्हाला मारहाण करतो’ अशी धमकी दिली.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : जीमहून परतणाऱ्या तरुणीची एकाने छेड काढत भर रस्त्यात तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीच्या मित्रांनाही त्याने धमकी दिली. हा प्रकार १० मे रोजी जयभवानीनगर रस्त्यावर घडला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग करणाऱ्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमीत सोनपसारे (२२, रा. महादेव मंदिराच्या बाजूला शिवशाहीनगर, मुकूंदवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

फिर्यादीनुसार पिडीता तरुणी ही जीम संपवून घरी जात होती. त्याच वेळेस सुमीत हा रस्त्यावर आला, त्याने तिला ‘आता तू कोणासोबत बोलत होतीस’ असे म्हणत छेड काढून विनयभंग केला.

दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या पिडीतेच्या दोघा मित्रांनाही त्याने ‘तुम्ही इथेच थांबा, मी माझ्या भाई लोकांना बोलावून तुम्हाला मारहाण करतो’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत घेतला अखेरचा श्वास!

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये उष्णतेचा कहर; ४२°C पार तापमानामुळे छोट्या व्यवसायिकांवर मोठा परिणाम

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

SCROLL FOR NEXT