Chh. Sambhajinagar Crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar Crime : तरुणाच्या छातीत घातल्या गोळ्या, वडगाव कोल्हाटीत आठवड्यातील दुसरी घटना; चार संशयित ताब्यात

वडगाव कोल्हाटी येथे एका तरुणाच्या छातीत गोळ्या घालून खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) पहाटे उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : वडगाव कोल्हाटी येथे एका तरुणाच्या छातीत गोळ्या घालून खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) पहाटे उघडकीस आली. कपिल सुदाम पिंगळे (वय ३४, रा. देवगिरीनगर, रांजणगाव शेणपुंजी) असे मृताचे नाव आहे. आठवडाभरापूर्वी याच परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला होता.

शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सिडकोच्या साईनगर वसाहतीतील महिला कचरा टाकण्यासाठी तीसगावला गेल्या. कचरा टाकताना त्यांना तीसगाव-वडगाव कोल्हाटी मार्गावरील साईबाबा चौकात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक तरुण दिसून आला.

त्यांनी तत्काळ घर गाठत कुटुंबीयांना माहिती दिली. घटनास्थळावर परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. वाळूज औद्योगिक वसाहत परिसर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहायक फौजदार विकास वैष्णव, विशेष शाखेचे योगेश शेळके, विक्रम वाघ,

राजेभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, विनोद नीतनवरे, उपनिरीक्षक मनोज शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुण रांजणगावातील कपिल पिंगळे असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. कपिलच्या आई-वडिलांनी घटनास्थळी आले. त्यांनी एकच आक्रोश करीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

कपिलचे होते हॉटेल

कपिलचे वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुड इअर कंपनी परिसरात हॉटेल होते. मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा परिसरात मोठा जनसंपर्क होता. त्याचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. गर्दीला दूर करताना पोलिसांची दमछाक झाली.

घटनास्थळावर गावठी कट्टा

पोलिसांना मृतदेहाच्या पायाजवळ मातीमध्ये एक गावठी कट्टा आढळून आला. शिवाय गोळी झाडल्यानंतर रिकामे झालेले एक काडतूसही आढळून आले.

चार संशयित ताब्यात

मारेकऱ्यांनी कपिलच्या छातीत गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी कपिलला मारण्यासाठी वापरलेला गावठी कट्टा घटनास्थळावरच सोडून पळ काढला. कपिलचा खून कशासाठी करण्यात आला. तो कुणी केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : पंतप्रधान आणि सभापतींच्या एआय द्वारे तयार केलेल्या व्हिडिओबद्दल ९ काँग्रेस नेत्यांना नोटीस

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT