Zilla Parishad School sakal
छत्रपती संभाजीनगर

Zilla Parishad School : आता जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजीतून परिपाठ;विद्यार्थ्यांना भाषा कौशल्य विकसित होण्यासाठी राबवला जाणार उपक्रम

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतून संवाद साधता यावा, यासाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतून परिपाठ घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतून संवाद साधता यावा, यासाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतून परिपाठ घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार यंदापासून शालेय अभ्यासक्रमात त्रिभाषा सूत्रांचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रथम भाषा मराठी, द्वितीय राष्ट्रीय भाषा हिंदी आणि तृतीय इंग्रजी या परकीय भाषेचा अभ्यासक्रमात समावेश आहे. शालेय पाठ्यपुस्तकांचा उद्देश हा विद्यार्थ्यांना आनंदी व श्रेणीबद्ध पद्धतीने विषय शिकविण्यास मदत होणे हा आहे.

भाषा शिकण्यासाठी ऐकणे, बोलणे, वाचणे व लिहिणे ही चार कौशल्ये सांगितली जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना जास्तीत-जास्त शब्द ऐकावयास मिळणे व त्याचा वापर दैनंदिन व्यवहारात करणे आवश्यक आहे. याचा विचार करूनच जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजीसह मराठी, हिंदी भाषेमध्ये परिपाठ घेण्याचा निर्णय घेतल्याचे मीना यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या १७ आदर्श शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम याआधीच सुरू करण्यात आलेला होता. त्याचे सकारात्मक परिणामदेखील दिसून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.

- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग).

सध्या सर्वत्र इंग्रजी भाषेचा बोलबाला आहे. संगणक कौशल्य विकसित करण्यासाठीदेखील इंग्रजीचा मोठा वापर होतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. तसेच, त्यांचा इंग्रजी भाषेबद्दलचा न्यूनगंड नाहीसा होईल.

- विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

परिपाठाचे वेळापत्रक

मराठी :सोमवार, मंगळवार

हिंदी : बुधवार, गुरुवार

इंग्रजी : शुक्रवार, शनिवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT