Ausa Ausa
मराठवाडा

औशात शिवसैनिकांनी जाळला नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा

शिवसैनिकांनी मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून येथील अप्रोच चौकात त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला

जलील पठाण

शिवसैनिकांनी मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून येथील अप्रोच चौकात त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला

औसा (लातूर): जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया औशात उमटल्या. मंगळवारी (ता.२४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांनी मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून येथील अप्रोच चौकात त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी तीव्र निषेध करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. त्यांनी मी तिथे असतो तर कानशिलात लावली असती अशी प्रतिक्रिया एका पत्रकार परिषदेत दिली होती. याचे तीव्र पडसाद औसा शहरासह तालुक्यात दिसून आले. शिवसैनिकांनी येथील अप्रोच चौकात मंत्री श्री. राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारत "कोंबडी चोर राणेंचा निषेध असो" आशा घोषणा देत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

त्यानंतर या शिवसैनिकांनी तहसीलदार यांना निवेदन देत नारायण राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. या आंदोलनात शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश शिंदे, शहर प्रमुख सुरेश भुरे, संजय उजळंबे, रोहित गोमदे, गणेश गायकवाड, जयंत चंदनशिवे यांच्यासह अनेक शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT