gharkul 
मराठवाडा

घरकुल लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा

संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली): मागील दहा महिन्यांपासून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना अनुदान मिळाले नसल्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. या प्रकारा विरुद्ध आता लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.

कळमनुरी शहरात पालीकेअंतर्गत १७८ लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल बांधकाम करण्यास मंजुरी मिळाली. पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना घरकुलाच्या बांधकामासाठी अडीच लाख रुपये अनुदान देण्याचे प्रयोजन आहे. यामध्ये एक लाख रुपये राज्य शासनाकडून व दीड लाख रुपये अनुदान केंद्र शासनाकडून देण्याचे नियोजन या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. 

६० हजार रुपयांचा दुसरा हप्ता वितरित

शहरातील घरकुलाची मंजुरी मिळालेल्या लाभार्थींनी आपली जुनी राहती घरे पाडून घरकुलाचे बांधकाम हाती घेतले. बांधकाम हाती घेतल्यानंतर आवश्यक असणारी वाळू मिळेनाशी झाल्यामुळे हे लाभार्थी अडचणीत सापडले होते. बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थींची पावसाळ्यातही मोठी ससेहोलपट झाली. या काळात पालिका प्रशासनाकडून घरकुलाचे बांधकाम हाती घेतलेल्या प्रत्येक लाभार्थीला ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. बांधकामाची प्रगती पाहून ६० हजार रुपयांचा दुसरा हप्ता ही बहुतांश घरकुल लाभार्थींना वितरित करण्यात आला.

शासनाकडून निधी मिळेना

त्यामुळे घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थींनी उधारी उसनवारी करून घरकुलाचे काम पूर्णत्वास नेले. मात्र या घटनेला आज दहा महिने उलटून गेल्यानंतरही घरकुलासाठी मंजूर असलेली उर्वरित रक्कम लाभार्थींना अद्याप मिळाली नाही. त्यामुळे हे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. घरकुलासाठी मंजूर असलेला उर्वरित निधी मिळावा, याकरिता दररोज पालिका कार्यालयात खेटे घालत आहेत. याबाबत पंतप्रधान आवास योजनेसाठी मागील काही महिन्यापासून शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे लाभार्थींना निधी कुठून द्यायचा हा प्रश्न पालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

येथे क्लिक करानांदेडला ‘कोरोना’चा तिसरा संशयीत
 
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 घरकुलाचे बांधकाम करून आर्थिक उसनवारी व देणे घेण्याच्या चक्रव्यूहात सापडलेल्या लाभार्थींनी आता याप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्‍यान, उधारी उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही निधी मिळत नसल्यामुळे श्रीरंग गाभणे, शिवाजी मोरे, बबनराव वाखारकर, गणेश देशमाने, विश्वनाथ बोराळे, बंडू विश्वनाथ पिंगळे, शांताबाई बाबूराव मोहिते यांच्यासह लाभार्थींनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

निधी उपलब्ध होताच वाटप करण्यात येईल

पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी पालिकेकडे राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या ७१ लाख २० हजार रुपयांच्या निधीचे लाभार्थींना वाटप करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून या योजनेसाठी अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. हा निधी उपलब्ध होताच लाभाथींना उर्वरित निधी वाटप करण्यात येईल.
-उत्तमराव शिंदे, नगराध्यक्ष
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

Jalna Unseasonal Rain : कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वारे, गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

Pune Census News : पुणे महापालिकेचा जनगणना कर्मचाऱ्यांना इशारा : निष्काळजी प्रगणकांवर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत कठोर कारवाईची तयारी

PSI Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार; पोलिस उपनिरीक्षक स्वदेश चव्हाणवर पुण्यात गुन्हा दाखल

NEET Paper leak: मनीषा हवालदार यांनी प्रश्नमालिकेच्या नोट्स जाळून टाकल्या; पतीच्या फोनवरुन मांढरेंना टाकले प्रश्न

SCROLL FOR NEXT