file photo 
मराठवाडा

बांगडी विक्रेत्याच्या मुलीचे भन्नाट यश : क्लास न लावता घरी राहून अभ्यास करत मिळवला आयआयटीत प्रवेश

गणेश पांडे

परभणी ः कारेगाव रस्त्यावर छोटंस बांगड्याचं दुकान चालविणार्‍या माने कुटूंबियातील अंकीता प्रचंड जिद्द व योग्य मार्गदर्शनाच्या बळावरच जेईई (अ‍ॅडव्हान्स) या परीक्षेत 793 रँक पटकावून आयआयटी इंजिनिअरिंग प्रवेशास पात्र ठरली.

वृंदावन कॉ़लनीजवळील सन्मीत्र कॉलनीतील अर्जुनराव माने यांचे कारेगाव रस्त्यावर बांगड्यांचे दुकान आहे. जेमतेम अशी आर्थिक परिस्थिती. त्यामुळे कुटूंबातील दोन मुली या अत्यंत हुशार असतानासुध्दा इतरांप्रमाणे ते मुलींना कोटा किंवा अन्य महानगरांकडे शिकावयास पाठवु शकले नाहीत. परंतु माने कुटूंबातील हीने अगदी जिद्दीने आणि योग्य अशा मार्गदर्शनाच्या बळावरच आयआयटी इंजिनिअरिंगचं आपल्या स्वप्नपूर्तीचा संकल्प सोडला. नव्हे परभणीसारख्या ठिकाणीच राहून, योग्य पध्दतीने अभ्यास करत यशसुध्दा पटकावलं. 

सोमवारी (ता. पाच) जेईई (अ‍ॅडव्हान्स) चा निकाल जाहीर झाला तेव्हा अंकिता हीने रँक 793 पटकावला अन् ती आयआयटी इंजिनिअरिंगसाठी पात्र ठरली. 

अंकिता आपल्या स्वप्नपूर्तीचा संकल्प पूर्ण करू शकली.

अंकीता ही कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी. तेथूनच ती इयत्ता दहावी उत्तीर्ण झाली. त्याचवेळी तीने इंजिनिअर करून आई-वडीलांना मदत करायची असाच निर्धार केला होता. त्यासाठी तीने बारावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पाठोपाठ अभ्यासात सातत्य राखलं,  दिवसातून नऊ ते दहा तास अभ्यास केला. अभ्यासाचे योग्य नियोजन केले. विशेषतः प्रा. सवंडकर यांचे तीला नियमितपणे योग्य ते मार्गदर्शन लाभले. सर्वतोपरी मदतही मिळाली. प्रा. संभाजी सवंडकर यांच्या प्रा. फेगडे व प्रा. शिंदे यांनी तीला गणित, भौतिकशास्त्र व केमिस्ट्रीसाठी योग्य पध्दतीने मार्गदर्शन केले. इंग्रजीसाठी चाफे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच अंकिता आपल्या स्वप्नपूर्तीचा संकल्प पूर्ण करू शकली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT