Beed Crime esakal
मराठवाडा

'बुलडाणा अर्बन' दरोड्यातील आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

शहागड येथील बुलडाणा अर्बनवर पडलेल्या दरोड्यातील दोन आरोपीला पकडण्यात गेवराई पोलिसांना यश आल्यानंतर याच प्रकरणातील तिसरा फरार आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.

वैजिनाथ जाधव

गेवराई (जि.बीड) : शहागड येथील बुलडाणा अर्बनवर पडलेल्या दरोड्यातील दोन आरोपीला पकडण्यात गेवराई पोलिसांना यश आल्यानंतर याच प्रकरणातील तिसरा फरार आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. त्याला गेवराई पोलिसांनी गोंदी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शहागड (ता.अंबड) येथील बुलडाणा अर्बन दिवसा दरोडा पडला होता. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले होते. याचा शोध जालना व गेवराई पोलीस घेत होते. दरम्यान गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे व त्यांचे दोन सहकारी यांनी गेवराई तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथून एका दरोडेखोराला, तर गेवराई शहरातील संजयनगर परिसरातून दुसऱ्यास अटक केली. दोन्ही आरोपींना 30 ऑक्टोबर रोजी सकाळी गोंदी पोलिसाना तसेच जालना पोलिसांना याची माहिती देण्यात आली व आरोपींना ताब्यात देण्यात आले होते.

या दरोड्यातील तिसरा आरोपी फरार झाला होता. याचा शोध सुरू असतांना खबऱ्यामार्फत गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांना फोन आला व कळवण्यात आले की तिसरा आरोपी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होत आहे. यावेळी काळे यांनी आरोपीला गेवराई पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले असता रविवार (ता.31) रोजी रात्री पोलीस ठाणे गोंदी (जि.जालना) येथील फरार आरोपी चरण काळू पवार (वय 22, रा.वनवली, पोस्ट काळे दौलतखान, ता.महागाव जि.यवतमाळ) हा गेवराई ठाण्यात हजर झाला व त्यास पुढील कारवाई साठी पोलीस ठाणे गोंदीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट २’वर पुन्हा वाद! काश्मिरी पंडित-बिहाऱ्यांवरील विनोद समय रैनाला भोवणार; भाजपकडून कारवाईची मागणी

Nepal Flood : पुण्यातील ८ नागरिक सुखरूप; तर एक जण बेपत्ता

Everest च्या हिंगच्या विक्रीवर तात्काळ बंदी! FSSAI च्या तपासणीत सॅम्पल फेल, आणखी एका कंपनीवरही कारवाई

Neeraj Chopra २०२६ वर्षात आता पुन्हा मैदानात दिसणार नाही, स्वत:च सांगितलं कारण; Asian Games आधी भारताला धक्का

Education Leader Passes Away: शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; विद्यार्थी चळवळ व राज्य शिक्षण धोरणात मोठे योगदान

SCROLL FOR NEXT