beed news  sakal
मराठवाडा

Beed News : जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व धमक्यांना कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

परळी तालुक्यातील कवटळी येथे विहिरीवर पाणी आणण्याच्या कारणावरून २०२१ मध्ये किशोर आणि सुधाकर झिंजुर्डे यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण झाल्याची घटना घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई- जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व धमक्यांना कंटाळलेल्या एका तरुणाने बुधवारी (ता.३०) येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

किशोर सीताराम झिंझुर्डे (वय ३०, रा. कवटळी, ता. परळी) असे या तरुणाचे नाव आहे. न्यायालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करीत असतानाच परिसरातील वकील, स्टॅम्प विक्रेते यांनी त्यास तत्काळ थांबवले. त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेत त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती शहर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. परळी तालुक्यातील कवटळी येथे विहिरीवर पाणी आणण्याच्या कारणावरून २०२१ मध्ये किशोर आणि सुधाकर झिंजुर्डे यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण झाल्याची घटना घडली होती.

त्यानंतर सुधाकर झिंजुर्डे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरील तरुणास धमक्या दिल्या जात असल्याचे किशोर झिंझुर्डे याची तक्रार आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासन आपणास कुठलीच मदत करत नसल्याचा आरोप या तरुणाने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT