bhagwat karad bhagwat karad
मराठवाडा

हिंगोलीत मंत्री भागवत कराड यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद

मंगळवारी त्यांनी नांदेडचा दौरा आटपून वारंगा मार्गे हिंगोलीकडे येत असताना वारंगा फाटा येथे शेतात जाऊन सोयाबीनची पाहणी केली

मुजाहेद सिद्दीकी

मंगळवारी त्यांनी नांदेडचा दौरा आटपून वारंगा मार्गे हिंगोलीकडे येत असताना वारंगा फाटा येथे शेतात जाऊन सोयाबीनची पाहणी केली

वारंगा फाटा (हिंगोली): जन आशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (bhagwat karad) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी नांदेडचा दौरा आटपून वारंगा मार्गे हिंगोलीकडे येत असताना वारंगा फाटा येथे शेतात जाऊन सोयाबीनची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी साहेब आम्ही पिठलं-भाकरी आणली खाणार का असे विचारले असता डॉ . कराड यांनी बाजेवर बसून पिठलं–भाकरी आणि ठेचा खात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हिंगोलीकडे येत असताना कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी रिमझिम पावसातच सोयाबीनच्या पिकाची पाहणी केली. पाहणी झाल्यानंतर डॉ. कराड परत निघाले असताना उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला. डॉ. कराड यांनी क्षणाचाही विलंब न करता जेवणाचे आमंत्रण स्वीकारले. येथील अजय कदम यांच्या शेतातील आखाड्यावर पिठलं-भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेतला.

यावेळी डॉ. कराड यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक विम्याबद्दलच्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करतात ते तुम्हाला मिळतात का असा प्रश्न केला असता आम्हाला ते पैसे मिळतात असे उत्तर शेतकऱ्यांनी दिल्यानंतर डॉ. कराड यांनी समाधान व्यक्त केले. तसेच काही शेतकऱ्यांचा रस्त्यात गेलेल्या शेतीचा भूसंपादन मोबदला बाकी असल्याचे सांगितले. यावर मी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलून तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन यावेळी मंत्री डॉ . भागवत कराड यांनी शेतकऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

इबोलाचं संकट! विमानतळापासून हॉस्पिटलपर्यंत तयार रहा, केंद्राचे राज्यांना निर्देश

Rajya Sabha polls: राज्यसभेत ‘क्रॉस वोटिंग’ची चर्चा; फक्त काही आमदार बदलू शकतात सगळं चित्र; कोणते आमदार बदलणार खेळ?

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

SCROLL FOR NEXT