Hingoli crime sakal
मराठवाडा

Hingoli crime : भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार

संशयित दोघे फरारी, नांदेडमध्ये उपचार सुरू

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली - भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी बंदुकीतून चार गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी त्यांच्या पाठीत लागल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत ते जखमी झाले आहेत. येथील जिल्हा परिषदेच्या आवारात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.

काही कामानिमित्त पप्पू चव्हाण हे जिल्हा परिषदेत आले होते. बांधकाम विभागातून आवारात येताच दोघांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. बचावासाठी ते खाली वाकले. एक गोळी त्यांच्या पाठीत घुसल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दोन गोळ्या आवारात पडल्याचे दिसून आले. या घटनेत जखमी झालेल्या चव्हाण यांना येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर दोघे पळून गेले. घटनास्थळापासून शंभर मीटरवर एकाची चप्पल आढळली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहिती घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गोळीचे तुकडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT